Wrestler Shivaji Chingali sakal
क्रीडा

Shivaji Chingali : आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पैलवान हरपला

राष्ट्रकूल स्पर्धेचे पदक विजेते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी निंगाप्पा चिंगळी यांचे रविवारी (ता. २१) निधन झाले. आज त्यांचा बारावा दिवस. त्यानिमित्ताने घेतलेला आढावा...

सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रकूल स्पर्धेचे पदक विजेते, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पैलवान, कुस्ती प्रशिक्षक शिवाजी निंगाप्पा चिंगळी यांचे रविवारी (ता. २१) निधन झाले. आज त्यांचा बारावा दिवस. त्यानिमित्ताने घेतलेला आढावा...

सांबरा येथील एका गरीब शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. बालपणापासून त्यांना कुस्तीची फारच आवड होती. गावातील महादेव व्यायाम मंडळाच्या तालमीत ते सराव करत होते. परिसरात आयोजित कुस्ती मैदानात त्यांनी अनेक कुस्त्याही त्यांनी जिंकल्या.

कुस्तीची आवड जोपासण्यासाठीच १९७१ मध्ये बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये शिपाई म्हणून ते भरती झाले. मराठा सेंटरमध्ये नामवंत वस्तादाच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे बारकावे आणि तंत्र आत्मसाद केले. राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक पटकावल्यानंतर त्यांची राष्ट्रकूल स्पर्धेसाठी निवड झाली.

न्यूझीलंडमध्ये १९७४ मध्ये झालेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत रौप्यपदक पटकावत आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी चमक दाखवली. त्या पाठोपाठ इराणची राजधानी तेहरान येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत कांस्य पदकाची कुस्ती अवघ्या एक गुणाने गमावली. पण, या पराभवाने निराश न होता सराव सुरूच ठेवला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत राष्ट्रीय पातळीवर १० सुवर्ण, तर सर्व्हिसीसच्या स्पर्धेत १४ सुवर्णपदके पटकावली.

पतियाळा (पंजाब) येथील क्रीडा संकुलन केंद्रात कुस्ती प्रशिक्षकाचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. त्यामुळे त्यांना आधुनिक पध्दतीचे कुस्तीचे धडे मिळाले. त्यामुळेच ते बेळगाव सेंटरमधील पैलवानांना कुस्तीचे प्रशिक्षण देत होते. दिल्लीतील आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी कुस्ती प्रशिक्षक म्हणून त्यांची निवड झाली होती. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पंच म्हणून त्यांनी सेवा बजावली. सध्या ते बेळगावच्या दर्गा तालमीत वस्ताद म्हणून सेवा बजावत होते. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.

- यल्लाप्पा हरजी, सांबरा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT