Wrestler Prithviraj Patil esakal
क्रीडा

कर हर मैदान फ़तेह! रशियातील कुस्ती स्पर्धेत भारताच्या पृथ्वीराजला 'कांस्य'

ज्युनिअर फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत पृथ्वीराज पाटीलची बाजी

मतीन शेख

कोल्हापूर : उफा (रशिया Russia) येथे सुरु असलेल्या जागतिक ज्युनिअर फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी (Junior freestyle wrestling competition) देवठाणे (ता. पन्हाळा) येथील कुस्तीपटू पृथ्वीराज पाटीलने (Wrestler Prithviraj Patil) कांस्य पदकाची कमाई केली आहे. ९२ किलो वजनी गटात चुरशीच्या लढतीत रशियाचा प्रतिस्पर्धी मल्ल किरील्लोवला धूळ चारत २-१ गुणाच्या फरकाने त्याने हा विजय मिळवला आहे.

उफा (रशिया) येथे सुरु असलेल्या जागतिक ज्युनिअर फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेसाठी कुस्तीपटू पृथ्वीराज पाटीलने कांस्य पदकाची कमाई केलीय.

पैलवान पृथ्वीराज हा शाहू कुस्ती केंद्र, शिंगणापूर (ता. करवीर) येथे वस्ताद जालिंदर मुंडे व माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर शिवाजी पाटील, प्रशिक्षक सुनील फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. तसेच उप महाराष्ट्र केसरी संग्राम पाटील, पै. धनाजी पाटील, वडील बाबासाहेब पाटील व आजोबा मारुती पाटील यांच्या पाठिंब्याच्या जोरावर त्याने यशाला गवसणी घातलीय. 'बॅक थ्रो' डावावर हुकूमत असलेल्या या कोल्हापूरच्या युवा मल्लाकडून अधिक अपेक्षा उंचावल्या आहेत. पैलवान पृथ्वीराज ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगून आपली वाटचाल सध्या करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

SCROLL FOR NEXT