Wrestler Protest Mahavir Phogat
Wrestler Protest Mahavir Phogat esaka
क्रीडा

Wrestler Protest : जनताच इंग्रजांप्रमाणे सरकारला पळवून लावेल... महावीर फोगाट म्हणाले मुली कुस्तीच सोडतील

अनिरुद्ध संकपाळ

Wrestler Protest Mahavir Phogat : दंगल गर्ल फेम महावीर फोगाट यांनी कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी दिलेली वागणूक पाहिल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. फोगाट कुटुंबीयांचे गाव बलाली येखील पंचायतीने मुलींना न्याय मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कधी काळी मुलगी बबिता फोगाटसोबत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या महावीर फोगाट यांनीच आता सरकराला पळवून लावण्याची भाषा केली आहे.

दुसरीकडे द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त महावीर फोगाट यांनी गावकऱ्यांशी चर्चा करताना मुलींची अवस्था पाहवत नाही असे सांगितले. आता देशाची जनताच इंग्राजांप्रमाणे या सरकारलाही पळवून लावेल. संपूर्ण देश एकत्र येत यावेळी निर्णायक आंदोलन करेल. गाव पंचायत पासून खाप, सामाजिक, शेतकरी संघटना यांच्याबरोबरच जनता या आंदोलनाची साक्ष बनेल.

महावीर फोगाट म्हणाले की, 'मी माझं सर्वस्व पणाला लावत मुलींना पदक जिंकण्याच्या क्षमतेचे बनवले. आज मुलींची झालेली अवस्था पाहवत नाही. दुःखी होत पदके गंगेत प्रवाहित करण्यासारखा निर्णय खेळाडूंना घ्यावा लागला. शेतकरी नेत्यांना मुलींच्या भावना समजून घेतल्या आता संपूर्ण देश एकत्र येऊन असं आंदोलन करणार की सरकारला झुकावं लागले.

बृजभूषणला जेल होणे गरजेचे

महावीर फोगाट म्हणाले की, जर बृजभूषण प्रकरणात सरकारने हस्तक्षेप केला नाही तर जनता इंग्रजांप्रेमाणे या सरकारला देखील पळवून लावेल. आज ते महिला कुस्तीपटूंसोबत झाले आहे ते पाहता मुली कुस्ती करणेच सोडून देतील. महिला कुस्तीपटूंच्या प्रकरणामुळे ज्युनियर खेळाडींच्या भविष्यावरही तलवार लटकली आहे. आता असं आंदोलन होईल की सरकारला झुकावंच लागेल आणि बृजभूषणला तुरूंगवास नक्की होईल.

बलाली गावचे लोक सरकावर नाराज

दिल्लीत महिला कुस्तीपटूंसोबत जे झाले त्यानंतर या प्राकराची खेळाडूंसोबतच खाप पंचायतींनीही निंदा केली. दिल्लीच्या घटनेनंतर विनेश आणि संगिता फोगाट

बलाली गांव के लोगों सरकार से नाराज असून त्यांचा सरकारविरूद्धचा रोष हा टिपेला पोहचला आहे. गावातील महिला जास्त चिडल्या आहेत. गावातील महिला सुनिता, मुन्नी, मीनादेवी आणि सुमन या म्हणाल्या की, मुली पदके जिंकतात त्यावेळी सरकार त्यांची स्तुती करते. त्यांच्यासोबत लैंगिक शोषण होते त्यावेळी सरकार डोळे बंद करून शोषण करू देते. हिटरल सारखी परिस्थिती देशात झाली आहे.

(Sports Latest News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT