Wrestler Protest Yogeshwar Dutt  esakal
क्रीडा

indian-wrestlers : योगेश्‍वर-विनेशमध्ये शाब्दिक ‘कुस्ती’

आंदोलक कुस्तीपटूंना सूट दिल्यानंतर नाराजीचा सूर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या ॲड हॉक समितीने बृजभूषण सिंहविरोधात आंदोलन करणाऱ्या विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, संगीता फोगाट, सत्यवर्त कडियन व जितेंदर किन्हा या कुस्तीपटूंना एक विजय मिळवून आशियाई स्पर्धेसाठी पात्र होता येईल अशी सूट दिली. त्यानंतर कुस्तीपटूंच्या पालकांकडून तसेच काही प्रशिक्षकांकडून नाराजीचा सूर उमटू लागला. माजी खेळाडू योगेश्‍वर दत्त व आंदोलक विनेश फोगाटमध्येही शाब्दिक चकमक घडून आली आहे.

योगेश्‍वर दत्तचे मुद्दे

ॲड हॉक समितीकडून नियमाविना सहा कुस्तीपटूंना सूट दिली आहे. रवी दहीया, दीपक पुनिया, सोनम मलिक, अंशू मलिक या पदकविजेत्यांनाही सूट देण्यात यायला हवी. ॲड हॉक समितीने कोणत्या निकषांवर सहा खेळाडूंना सूट दिली हे समजण्यापलीकडे आहे.

सूट देण्यात आलेले सहाही कुस्तीपटू एक वर्ष मॅटपासून दूर आहेत. त्यामुळे इतर कुस्तीपटूंनी याविरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे.

फोगाटकडून प्रत्युत्तर

योगेश्‍वर दत्त याची महिला कुस्तीपटूंसाठी तयार करण्यात आलेल्या समितीत निवड करण्यात आली होती. या समितीसमोर महिला कुस्तीपटू आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत सांगत होती, तेव्हा योगेश्‍वर दत्त हसत होता.

योगेश्‍वर दत्त याने महिला कुस्तीपटूला स्पष्ट सांगितले की, अशा गोष्टी होतच राहतात. हे प्रकरण लांबवू नका. त्याने कुस्तीपटूंच्या घरी फोन करून आपल्या मुलींना समजावून सांगा, अशी धमकीही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT