Wrestlers Protest SAKAL
क्रीडा

Wrestlers Protest: 'लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ द्या' दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूकडून मागवले अजब पुरावे

Kiran Mahanavar

Wrestlers Protest : ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करणाऱ्या महिला कुस्तीपटूंकडून लैंगिक शोषणाचे पुरावे मागितले आहेत.

दिल्ली पोलीस सध्या सर्व प्रकारचे पुरावे गोळा करण्यात गुंतले आहेत जेणेकरून 15 जून रोजी आरोपपत्र दाखल करता येईल. दरम्यान, खेळाडूंकडून लैंगिक शोषणाचे फोटो आणि व्हिडिओ मागवण्यात येत आहेत. यापूर्वी या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या क्रीडा मंत्रालयाच्या निरीक्षण समितीनेही महिला कुस्तीपटूंकडून असेच पुरावे मागवले होते.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, एका महिला कुस्तीपटूने एफआयआर दाखल केला होता की, 2016 ते 2019 दरम्यान ब्रिजभूषण सिंगने अशोका रोड येथील अधिकृत निवासस्थानी भारतीय कुस्ती महासंघाच्या कार्यालयात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

दिल्ली पोलिसांनी महिला कुस्तीपटूंना सीआरपीसीच्या कलम 91 अंतर्गत नोटिसा पाठवल्या, ज्यावर त्यांना एका दिवसात उत्तर द्यावे लागले. दिल्ली पोलिसांनी या घटनेचे व्हिडिओ पुरावे मागवले आहेत.

त्याचवेळी, दुसर्‍या तक्रारीत असे म्हटले आहे की, पदक समारंभात ब्रिजभूषण सिंहने तिला 10 ते 15 सेकंद जबरदस्तीने मिठी मारली होती. यावेळी ब्रिजभूषण सिंह यांनीही छातीवर हात ठेवला. पोलिसांनी घटनेचा फोटो मागवला आहे.

पोलिसांनी तक्रारदार महिलांकडून घटनेची तारीख आणि वेळ त्यांनी फेडरेशनच्या कार्यालयात घालवलेली वेळ याबद्दल माहिती मागवली आहे. ब्रिजभूषण यांना भेटताना ती ज्या हॉटेलमध्ये राहिली होती त्या हॉटेलची माहितीही त्यांनी मागितली आहे. यासोबतच एफआयआर दाखल केल्यानंतर मिळणाऱ्या धमक्यांचा व्हिडिओ, ऑडिओ, कॉल रेकॉर्डिंग पुराव्याचीही मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत महान देश, माझा मित्र तिथं टॉपचा नेता; शरीफ यांच्यासमोर ट्रम्पकडून PM मोदींचं कौतुक

Weather Update : 'मॉन्सून'बाबत महत्त्वाची अपडेट! महाराष्ट्रातील बहुतांश भागांतून पावसाची माघार; हवामान विभागानं काय सांगितलं?

ICC Womens World Cup 2025 : स्पर्धेत राहण्यासाठी टीम इंडिया स्ट्रॅटेजी बदलणार? दोन पराभवानंतर हरमनप्रीत कौरला कठोर निर्णय घ्यावेच लागणार...

Latest Marathi News Live Update : पुणेकरांची दिवाळी यंदा धूमधडाक्यात! फटाक्यांची दुकानं राहणार २४ तास खुली

Solapur News: 'शेतकऱ्यांचा माजी गृहराज्यमंत्र्यांच्या दारात टाहो'; दोन वर्षांपासून पाच कोटींची रक्कम थकवली, साेलापुरात बेमुदत उपोषण

SCROLL FOR NEXT