wrestlers protest two women wrestlers reveal pretext of checking breath stomach brij bhushan touched breast Marathi News 
क्रीडा

ब्रिजभूषण यांनी श्वास तपासण्याच्या बहाण्याने स्तन, पोटाला केला स्पर्श; महिला पैलवानांचा धक्कादायक जबाब!

Kiran Mahanavar

Wrestlers Protest Brij Bhushan Sharan Singh : भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत रस्त्यावर आंदोलनाला बसले आहेत. कुस्तीपटू जंतर - मंतरवर आंदोलन करत आहेत. यादरम्यान द इंडियन एक्स्प्रेसला मिळालेल्या माहितीनुसार, सात महिला कुस्तीपटूंपैकी दोन कुस्तीपटूंनी WFI अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

21 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. दोन वेगवेगळ्या तक्रारींमध्ये किमान आठ घटनांचा उल्लेख आहे. यामध्ये टूर्नामेंट, वॉर्म अप आणि अगदी नवी दिल्लीतील WFI कार्यालयात लैंगिक छळ आणि गैरवर्तन (विनयभंग, अयोग्य स्पर्श आणि शारीरिक संपर्कासह) अनेक घटनांचा समावेश आहे.

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात नव्याने तक्रार दाखल करणाऱ्या दोन महिला कुस्तीपटूंनी म्हटले आहे की, ब्रिजभूषणने दोन्ही महिला कुस्तीपटूंना अयोग्यरित्या स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता.

तक्रारदार कुस्तीपटूंनी म्हटले आहे की, ब्रिजभूषण सिंह यांनी श्वास तपासण्याच्या बहाण्याने त्यांच्या पोटाला आणि स्तनाला स्पर्श केला. दोन महिला कुस्तीपटूंनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, ब्रिजभूषण सिंगने त्यांचे मानसिक आणि शारीरिक शोषण केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT