Wrestlers Protest Vinesh Phogat 
क्रीडा

Vinesh Phogat : विनेश फोगटच्या वाढल्या अडचणी! परदेशात ट्रेनिंगसाठी नाही मिळाला व्हिसा

Kiran Mahanavar

Vinesh Phogat : काही काळापूर्वी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू आता मैदानातवर परतण्याच्या तयारीत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी खेळाडूंनी तयारी सुरू केली आहे. या खेळांच्या चाचण्या लवकरच होणार आहेत. आंदोलनला बसलेल्या खेळाडूंना प्रशिक्षणासाठी परदेशात जायचे होते, त्यासाठी त्यांना परवानगी मिळाली. तीन वेळची कॉमनवेल्थ चॅम्पियन विनेश फोगटच्या अडचणी वाढल्या आहे, तिला हंगेरीला जाण्यासाठी व्हिसा मिळू शकला नाही.

विनेश फोगटला नाही मिळाला व्हिसा

कझाकस्तानमधील बिश्केक येथील प्रशिक्षण शिबिरात सहभागी होण्यासाठी विनेश शनिवारी निघणार होती, परंतु तिचा पासपोर्ट अद्याप हंगेरियन दूतावासात अडकला आहे. विनेशकडे ई-व्हिसा आहे. या प्रकरणाची माहिती क्रीडा मंत्रालय तसेच परराष्ट्र मंत्रालयाला देण्यात आली. TOPS आणि SAI अधिकार्‍यांनी परराष्ट्र मंत्रालयाला हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्यास सांगितले.

परराष्ट्र मंत्रालय आले मदतीला

परराष्ट्र मंत्रालयाने हंगेरियन दूतावासाच्या अधिकार्‍यांना पत्र लिहून हे प्रकरण लवकरात लवकर सोडवण्यास सांगितले आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार अधिकाऱ्यांनी विनेशला लवकरात लवकर व्हिसा दिला जाईल, असे आश्वासन दिले आहे.

विनेश 2 ते 10 जुलै दरम्यान बिश्केक येथे प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार होती, त्यानंतर ती 10 ते 28 जुलै दरम्यान बुडापेस्टला जाणार होती. ती बुडापेस्ट येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय रँकिंग सिरीज स्पर्धेत भाग घेणार आहे. विनेश तिच्या फिजिओथेरपिस्ट अश्विनी जीवन, जोडीदार संगीता फोगट आणि प्रशिक्षक सुदेश यांच्यासोबत जाईल.

साक्षी मलिक आणि बजरंग पोहोचले कझाकिस्तानला

विनेश फोगटसोबत धरणे आंदोलनात उपस्थित असलेले बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकही कझाकिस्तानला रवाना झाले आहेत. बजरंगसोबत त्याचे फिजिओ अनुज गुप्ता, पार्टनर जितेंद्र किन्हा आणि स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग तज्ज्ञ काजी किरण आहेत. त्याचवेळी साक्षी मलिकसोबत तिचा पती सत्यव्रत कादियानही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

Eknath Shinde: अस्वस्थ एकनाथ शिंदेंची अमित शाहांकडे नाराजी? थेट मुद्द्यालाच हात घातल्याची माहिती; इकडे फडणवीस-पवारांची गुप्त बैठक

Ayurvedic Kadha for Winter: थंडीमुळे सर्दी-खोकला आणि अंगही खाजतंय? 'हा' आयुर्वेदीक काढा आहे सुपर इफेक्टिव्ह!

Pune Cold : पुण्यात सलग तीन दिवस १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद

Fact Check: बिबट्या खरंच रणजी ट्रॉफी सामन्यावेळी धरमशाला स्टेडियममध्ये घुसला? जाणून घ्या Viral Video मागचं सत्य

SCROLL FOR NEXT