Wriddhiman Saha Journalist Bullied Boria Majumdar  esakal
क्रीडा

Video: धमकी प्रकरणाला वेगळे वळण; साहावर 'त्या' पत्रकाराचा गंभीर आरोप

सकाळ डिजिटल टीम

वृद्धीमान साहाला (Wriddhiman Saha) पत्रकाराने धमकी (Journalist Bullied) दिल्याच्या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. बीसीसीआयने या प्रकरणाची चौकाशी करण्यासाठी तीन सदसीय समिती स्थापन केली होती. त्यासमोर वृद्धीमान साहाने धमकी देणाऱ्या पत्रकाराचे नाव उघड केले. यानंतर वरिष्ठ क्रीडा पत्रकार आणि बॅक स्टेज विथ बोरिया हा यू ट्यूब चॅनेल चालवणाऱ्या बोरिया मुजूंमदार (Boria Majumdar) यांनी सोशल मीडियाद्वारे आपली बाजू मांडली. त्यांनी वृद्धीमान साहाने व्हॉट्स अप चॅटमध्ये छेडछाड केल्याचा आरोप केला.

बीसीसीआयच्या (BCCI) राजीव शुक्ला, अरूण धुमल आणि प्रभतेज सिंग भाटिया या तीन सदसीय चौकशी समितीसमोर वृद्धीमान साहाने पत्रकार धमकी प्रकरणात आपले म्हणणे मांडले. यानंतर साहा प्रतिक्रिया देताना म्हणाला की, 'मला जे माहिती होते ते मी समितीसमोर सांगितले आहे. मी त्यांना सर्व तथ्ये दिली आहेत. मी तुम्हाला फरसे काही सांगू शकणार नाही. बीसीसीआयने मला याबाबत माध्यमांमध्ये काहीही बोलू नकोस असे सांगितले आहे. या संबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे बीसीसीआय देणार आहे.'

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार वृद्धीमान साहाने बोरिया मुजूंमदार यांचे नाव घेतले आहे. यानंतर मुजूंमदार यांनी वृद्धीमान साहावर मानहानीचा (Defamation) दावा ठोकणार असल्याचे सांगितले. ते म्हणाला की साहाने व्हॉट्स अॅप चॅटच्या स्क्रीन शॉटमध्ये छेडछाड केली आहे. याचबरोबर त्यांनी ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत आपली बाजू देखील मांडली.

या व्हिडिओत ते म्हणतात की, 'मी या माणसाबरोबर 19 फेब्रुवारीला बोललोच नाही. माझे कॉल रेकॉर्ड आणि त्याचे कॉल रेकॉर्ड तपासले जावेत. मी त्याच्याबरोबर 13 फेब्रुवारीला शेवटचे बोललो होतो. मी त्याचे गुजरात टायटन्सने 1.9 कोटी रूपयाला विकत घेतल्याबद्दल अभिनंदन केले होते. त्यावेळी त्याने घरी गेल्यावर 8 वाजता मी तुमच्याशी बोलतो असे सांगितले आणि माझ्याकडे झूमची लिंक मागितली. त्यानंतर मी दोन तास त्याची वाट पाहिली.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

IND vs AFG: ३२ चेंडूत ८२ धावांच्या खेळीनंतर काय म्हणाला अभिषेक शर्मा? दुबेला २०वी ओव्हर देण्यावर श्रेयस अय्यरचेही स्पष्टीकरण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात

कोट्यवधींचं पॅकेज! अमेरिकेत अतिश्रीमंतांच्या घरी जेवण बनवणाऱ्यांना किती पैसे मिळतात?

SCROLL FOR NEXT