Wriddhiman Saha 
क्रीडा

Wriddhiman Saha : मॅच खेळायला वृद्धिमान साहाने चक्क दिला नकार; काय आहे प्रकरण

रिद्धिमान साहाने अचानक घेतला मोठा निर्णय

Kiran Mahanavar

Wriddhiman Saha : टीम इंडिया सध्या 1 महिन्याच्या विश्रांतीवर आहे, त्यानंतर टीम 12 जुलैपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. विंडीज दौऱ्यावर टीम इंडियाला कसोटी सोबतच एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळायची आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने होईल.

12 ते 16 जुलै दरम्यान पहिली कसोटी तर 20 ते 24 जुलै दरम्यान दुसरी कसोटी खेळल्या जाणार आहे. याआधीही टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहाने अचानक मोठा निर्णय घेतला आहे.

भारतीय क्रिकेटच्या देशांतर्गत हंगामाची सुरुवात 28 जूनपासून दुलीप ट्रॉफीने होणार आहे. या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. वृद्धिमान साहाने या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला आहे.

पीटीआयच्या वृत्तानुसार, ईशान किशनला पूर्वी पूर्व विभागीय संघात सामील करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु वेस्ट इंडिज दौऱ्यामुळे त्याने आपले नाव मागे घेतले. यानंतर वृद्धिमान साहाला याबाबत विचारण्यात आले, मात्र त्याने स्पष्ट नकार दिला. यामागचे कारणही त्यांनी दिले आहे.

वृद्धिमान साहानेने आपल्या या निर्णयामागचे कारण सांगितले की, दुलीप ट्रॉफी युवा खेळाडूंसाठी आहे. मी जर त्याचा एक भाग असलो तर कोणत्या तरी युवा खेळाडूची खेळण्याची संधी जाईल. पूर्व विभागीय संघासाठी निवडकर्त्यांनी युवा यष्टीरक्षक फलंदाज अभिषेक पोरेलची निवड केली आहे, जो आयपीएल 2023 मध्ये खेळला आहे.

अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी नुकत्याच झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलमध्ये वृद्धिमान साहाला संघात समाविष्ट करण्याचे मत व्यक्त केले होते. मात्र निवडकर्त्यांनी केएस भरत आणि इशान किशन यांचा संघात समावेश केला. तर या सामन्यात केएस भरतला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली.

या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून 209 धावांनी मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. टीम इंडियाची सलग दुसऱ्यांदा टेस्ट चॅम्पियन बनण्याची संधी हुकली. यासह संघाचे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT