New Zealand beat Sri lanka 
क्रीडा

NZ vs SL: वेलिंग्टन कसोटीत श्रीलंकेचा 4 दिवसांत पराभव! न्यूझीलंडने केला क्लीन स्वीप

Kiran Mahanavar

New Zealand beat Sri lanka : न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील वेलिंग्टन कसोटी चार दिवसांत संपली. वेलिंग्टन येथील दुसऱ्या कसोटीत यजमान किवींने श्रीलंकेचा एक डाव आणि 58 धावांनी पराभव केला. यासह त्याने 2 कसोटी मालिकेत क्लीन स्वीप केला. वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडने श्रीलंकेला फॉलोऑन करण्यास भाग पाडले, ज्यावर पाहुण्या संघाला मात करता आली नाही आणि सामना गमावला. याआधी क्राइस्टचर्च कसोटीत श्रीलंकेचा न्यूझीलंडकडून 1 धावांनी पराभव झाला होता.

न्यूझीलंडने वेलिंग्टन कसोटीत प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या डावातच 580 धावा केल्या. 8 विकेट्स गमावून ही धावसंख्या उभारल्यानंतर न्यूझीलंडने पहिला डाव घोषित केला. न्यूझीलंडला पहिल्या डावात मोठी धावसंख्या गाठेपर्यंत केन विल्यमसन आणि हेन्री निकोल्सचा मोठा हात होता.

यात केन विल्यमसनच्या 215 धावांचे योगदान होते. 240 चेंडूंचा सामना करताना हेन्री निकल्सने नाबाद 200 धावा केल्या. दोघांमध्ये 350 हून अधिक धावांची भागीदारी झाली, ज्यामुळे किवी संघासाठी हे काम सोपे आणि श्रीलंका संघ आणि त्यांच्या गोलंदाजांसाठी कठीण झाले.

न्यूझीलंड संघाने केलेल्या धावसंख्येला उत्तर देण्यासाठी श्रीलंका मैदानावर उतरला तेव्हा कर्णधार दिमुथ करुणारत्नेच्या 89 धावा असूनही त्यांचा पहिला डाव अवघ्या 164 धावांवर आटोपला. याचा बंपर फायदा किवी संघाला झाला. त्यांना मोठी आघाडी मिळाली, त्यानंतर त्याने श्रीलंकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला.

सामन्याच्या तिसऱ्या दिवसापर्यंत दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या केवळ 2 विकेट्स पडल्या होत्या. मात्र चौथ्या दिवशी ऑलआऊट होण्यापासून ते स्वत:ला वाचवू शकले नाहीत. श्रीलंकेचा संघ आपल्या दुसऱ्या डावात केवळ 358 धावाच करू शकला. अशाप्रकारे न्यूझीलंडच्या आघाडीपासून 58 धावा दूर राहिला. यजमानांनी हा सामना एक डाव आणि 58 धावांनी जिंकला. केन विल्यमसन हा न्यूझीलंडच्या फतेह मालिकेतील मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू होता. तर सामनावीर म्हणून हेन्री निकल्सची निवड करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Alert: 60 किलोमीटरच्या वेगाने दिल्लीच्या दिशेने येतेय वादळ! 'नोएडा'सह लगतची शहरं अंधारात

Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठी भेट! मुंबईतून पुन्हा धावणार ‘मोदी एक्स्प्रेस’; बुकिंग कधीपासून? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Nepal Floods: हिमालय धोक्यात? नेपाळच्या महापुराने वाढवली भारताची चिंता! नेमकं काय घडतंय?

Bank Holiday: रक्षाबंधनला बँका बंद की सुरू? पाहा RBI काय सांगते

IND vs SL: फॉलोऑन देऊनही फसला प्लॅन! भारताच्या हातातून विजय निसटला, दिनूशा एकटा नडला; कोलंबो कसोटी 'ड्रॉ'

SCROLL FOR NEXT