WTC Final 2023 Fan proposes his girlfriend on camera video goes viral  
क्रीडा

WTC फायनलमध्ये पठ्याचा पराक्रम...लिप किसचा व्हिडीओ व्हायरल

सामन्यावेळी चौथ्या दिवशी एका तरुणाने गर्लफ्रेंडला प्रपोज केलं अन्...

धनश्री ओतारी

मॅच कोणतीही असो मैदानातील अनेक क्षण कॅमेरामध्ये कैद होत असतात. असा एक सीन कॅमेरामध्ये कैद झाला आहे. जो सध्या चर्चेत आला आहे. (WTC Final 2023 Fan proposes his girlfriend on camera video goes viral)

क्रिकेटच्या मैदाना अनेकदा प्रपोजच्या गोष्टी घडल्या आहेत. यामध्ये क्रिकेट प्रेमींसोबत खेळाडूंचादेखील समावेश आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC Final सामना हा ऐतिहासिक वळणावर येऊन ठेपला आहे. याच मॅचदरम्यानचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे.

सामन्यावेळी चौथ्या दिवशी एका तरुणाने गर्लफ्रेंडला प्रपोज केलं आणि अंगठी घातली. इतकचे नव्हे तर त्या दोघांनी एकमेकांना किसदेखील केलं.

नेमकं काय घडलं?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये चौथ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावातील पाचव्या षटकावेळी अचानक एक चाहता त्याच्या जागेवरून उठला आणि त्याच्या गर्लफ्रेंडकडे वळला. तिला काही कळायच्या आतच तरुणाने अंगठी घातली.

अचानक मिळालेल्या या सरप्राइजने तरुणीला सुखद धक्का बसला. त्यानंतर त्याने तिला जवळ घेत किस केले. त्यांचा हा रौमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला दुसऱ्या डावात 444 धावांचे अशक्यप्राय असं आव्हान दिलं आहे. चौथ्या दिवसअखेर भारताची अवस्था 3 बाद 164 अशी झाली आहे. अखेरच्या दिवशी भारताला विजयासाठी आणखी 280 धावांची गरज आहे. सामना पाचव्या दिवसापर्यंत पोहोचला असून आज विजेता कोण ते ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS March : मोठी बातमी! मीरा- भायंदरमधील मोर्चाआधीच मनसेचे अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात, भल्या पहाटे कारवाई

आनंदाची बातमी! 'अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन': मंत्री आदिती तटकरेंची विधान परिषदेत घाेषणा

Healthy Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा कुरकुरीत रवा-पोहे डोसा, पाहा सोपी आणि चटपटीत रेसिपी

Everything About Hormones: हार्मोन बिघाड म्हणजे काय? कारणं, लक्षणं आणि उपचार यांची संपूर्ण माहिती

Satara Crime: संतापजनक घटना! 'शिवथरमध्ये विवाहितेचा गळा चिरून निर्घृण खून'; घरात काेणीच नसल्याची संधी साधली अन्..

SCROLL FOR NEXT