WTC Final ICC Fined Team India  esakal
क्रीडा

WTC Final ICC Fined Team India : आयसीसीनं ठोठावलेला दंड कोण भरतं, खेळाडू की क्रिकेट बोर्ड?

अनिरुद्ध संकपाळ

WTC Final ICC Fined Team India : आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होते न होते तोच भारतीय संघाला जबर दंड ठोठावला. भारतीय संघाने संथ गतीने षटके टाकल्याने संपूर्ण संघाला सामन्याच्या मानधनातून शंभर टक्के रक्कम दंड वसूल केली जाणार आहे. म्हणजे संघातील प्रत्येक खेळाडूचे सामन्याचे पूर्ण मानधन हे कापले जाणार आहे. आयसीसीने ऑस्ट्रेलियन संघाला देखील याच कारणासाठी दंड ठोठावला असून त्यांच्या सामन्याच्या मानधनातून 80 टक्के रक्कम कापून घेतली जाणार आहे. (ICC Fined Team India Who Will Pay Fined Money)

भारतीय संघाची 100 टक्के आणि ऑस्ट्रेलियन संघाची 80 टक्के रक्कम कशी काय कापली जाणार असा प्रश्न सर्वांना पडला असेल. हा दुजाभाव फक्त एका षटकामुळे झाला आहे. भारतीय संघाने ठरलेल्या वेळेत ठरलेल्या षटकांपेक्षा 5 षटके कमी टाकली. नियमानुसार एका षटकाला सामन्याच्या मानधनातील 20 टक्के रक्कम कापली जाते. त्यानुसार भारतीय संघातील खेळाडूंच्या मानधनातील शंभर टक्के रक्कम कापली गेली. तर ऑस्ट्रेलियाने 4 षटके कमी टाकल्याने त्यांच्या सामन्याच्या मानधनातील 80 टक्के रक्कम कापली गेली.

शुभमन गिलसोबत तर वेगळाच खेळ झाला. ग्रीनच्या वादग्रस्त कॅचचा फोटो ट्विटरवर टाकून तिसऱ्या अंपायरला चिमटा काढणे त्याला चांगलेच भोवले. स्लो ओव्हर रेटमुळे त्याचे सामन्याचे संपूर्ण मानधन कापले गेले आहेच आता सोशल मीडियावरील पोस्टमुळे त्याला सामन्याच्या मानधनातील अतिरिक्त 15 टक्के रक्कम दंड म्हणून भरावी लागणार आहे. त्यामुळे गिल वादग्रस्तरित्या बाद झालाच. त्यासोबत त्याला मोठा आर्थिक दंड देखील सोसावा लागणार आहे.

सामन्याची दंड म्हणून कापून घेतलेली रक्कम कोण भरतं असा एक उत्सुकतेचा प्रश्न सर्वांना पडला असेल. याबाबत अधिकृत अशी माहिती सध्या तरी उपलब्ध नाही. मात्र बीसीसीआय किंवा इतर क्रिकेट बोर्ड हे खेळाडूंनी सामन्याचे मानधन देत असल्याने सहाजिकच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ही रक्कम क्रिकेट बोर्डच भरत असल्याची शक्यता आहे. मात्र यातून आर्थिक नुकसान हे शेवटी खेळाडूचेच होण्याची शक्यता आहे.

जरी सामन्याच्या मानधनातील रक्कम कापली गेली असली तरी क्रिकेट बोर्डाने खेळाडूसोबत केलेल्या केंद्रीय कराराच्या रक्कमेतून ही रक्कम वजा होत नाही. कारण खेळाडूला सामन्याचे मानधन हे केद्रीय कराराव्यतिरिक्त मिळत असते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs KKR : मुकुल चौधरीने लखनौला रोमहर्षक विजय मिळवून दिला, संजीव गोएंका यांनी त्यानंतर काय केलं ते पाहा Video Viral

Mukul Choudhary: देवाने मला संधी दिली...! मुकुल चौधरीचे मन जिंकणारं विधान; म्हणाला, गावातील तरुण सीमेवर लढत आहेत, मी...

Who is Mukul Choudhary? लखनौ सुपर जायंट्सचा 'टायगर'! कोलकाता नाइट रायडर्सच्या जबड्यातून विजय खेचून आणणारा नायक...

KKR vs LSG Live: मुकुल चौधरीने KKR च्या हातून मॅच खेचून नेली; लखनौचा रोमहर्षक विजय, IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

Strait of Hormuz: 'होर्मुझ'मधून जायचं असेल तर 'क्रिप्टोकरन्सी' किंवा चिनी 'करन्सी'मध्ये व्यवहार करा! इराणकडून नियमांची यादी

SCROLL FOR NEXT