IND vs NZ Twitter
क्रीडा

WTC Final : भारतीय चाहत्यांकडून किवी खेळाडूंना अपशब्द

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे जनरल मॅनेजर क्लेयर फरलॉन्ग यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भात कारवाई करण्यात आल्याची माहिती दिलीये.

सुशांत जाधव

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनल रंगतदार अवस्थेत आहे. रिझर्व्ह डे दिवशी या सामन्याचा निकाल लागणार की मेगा फायनल अनिर्णित राहणार? असा प्रश्न पडला असताना सामन्यादरम्यान धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. पाचव्या दिवशीच्या खेळात न्यूझीलंडच्या रॉस टेलरला वर्णद्वेषाचा सामना करावा लागला. सामना पाहण्यासाठी स्टेडियमवर उपस्थितीत असलेल्या प्रेक्षकांमधून रॉस टेलरला आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला. ज्यांनी हे कृत्य केले ते भारतीय समर्थक असून त्यांना त्याचवेळी स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीचे जनरल मॅनेजर क्लेयर फरलॉन्ग यांनी ट्विटच्या माध्यमातून यासंदर्भात कारवाई करण्यात आल्याची माहिती दिलीये. डॉमिनिक डा सूजा नावाच्या व्यक्तीने ट्विटरच्या माध्यमातून आयसीसीच्या मॅनेजर्सला मेन्शन करत यासंदर्भात तक्रार केली होती. स्टेडियमवरील प्रेक्षकांच्या कृत्यावर कुणाचे लक्ष आहे का? असा संतप्त प्रश्न विचारत डॉमिमिनिक या ट्विटर युजर्सने न्यूझीलंड संघातील खेळाडूंना अपशब्द वापरण्यात येत आहेत, याकडे लक्षवेधण्याचा प्रयत्न केला होता. न्यूझीलंड संघाला उद्देशून अपशब्द वापरणाऱ्या व्यक्तिने रॉस टेलरला वर्णभेदी टिप्पणी केली, असा उल्लेखही ट्विटच्या माध्यमातून करण्यात आला होता.

या ट्विटनंतर आयसीसीने तात्काळ पावले उचलत सुरक्षा रक्षकांना घटनास्थळी पाठवले. ज्या व्यक्तींकडून हा प्रकार सुरु होता त्या दोघांना स्टेडियम बाहेर काढण्यात आले. क्लेयर यांनी ट्विटवरुन दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात दोघांची ओळख पटली आहे. गैरवर्तन केल्याप्रकरणी त्यांना स्टेडियममधून बाहेर काढण्यात आले. याप्रकाराच्या कृत्याचे कधीच समर्थन करता येणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT