WTC Point Table  esakal
क्रीडा

WTC Point Table : विजय ऑस्ट्रेलियाचा.. पराभव पाकिस्तानचा... मात्र फायदा झाला भारताचा

अनिरुद्ध संकपाळ

WTC Point Table : ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकला. कांगारूंनी पाकिस्तानचा 360 धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियात सलग 15 व्या कसोटीत पराभव केला आहे. मात्र विजय ऑस्ट्रेलियाचा आणि पराजय पाकिस्तानचा झाला असला तरी याचा फायदा मात्र भारताला झाला आहे.

भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. तर 360 धावांनी दारूण पराभव झाल्यानंतर पाकिस्तानची पॉईंट टेबलमधील त्यांच्या अव्वल स्थानात वाटेकरी निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यानंतर आता पर्सेंटेज ऑफ पॉईंट्समध्ये पाकिस्तान आणि भारत समान पातळीवर आले आहेत. दोघांचेही पर्सेंटेज हे 66.67 इतके असल्याने दोघेही संयुक्तरित्या अव्वल स्थानावर विराजमान झाले आहेत.

WTC पॉईंट टेबलमध्ये अव्वल असणाऱ्या पाकिस्तानचे या सामन्यापूर्वी विनिंग पर्सेंटेज हे 100 टक्के होते. त्यांचे गुण देखील 24 होते. भारताचे 2 सामन्यात 16 गुण झाले आहेत. भारत WTC गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर होते.

मात्र ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 360 धावांनी पराभव केला अन् सगळं गणित बदललं. पाकिस्तानचे गुण कमी झाल्याने गुणतालिकेवर काही परिणाम झाला नाही. मात्र त्यांच विनिंग पर्सेंटेज हे 66.67 वर आलं. भारत आणि पाकिस्तान यांच पर्सेंटेज समान असल्याने दोन्ही संघ संयुक्तरित्या अव्वल स्थानावर विराजमान झाले.

पाकिस्तानने आतापर्यंत दोन कसोटी जिंकल्या आहेत तर एका कसोटीत पराभव झाला आहे. तर भारताने दोन पैकी एक कसोटी जिंकली असून एक कसोटी ड्रॉ झाली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ईडीने जप्त केलेली 3,464 कोटींची मालमत्ता विक्री करण्यास कोर्टाची मंजुरी; गुंतवणूकदारांचे 1,950 कोटी माघारी मिळणार

Akola Crime : कार लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! ‘एलसीबी’कडून सहा तासांत तीन आरोपी अटकेत, १८.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखान्याच्या विजयी उमेदवारांनी अजितदादांना वाहिली आदरांजली

Cordelia Sky : १,५०० ड्रोनच्या रोषणाईने मुंबईचे आकाश उजळले! ‘कॉर्डेलिया स्काय’चे आगमन

INS Mangrol : मुंबईच्या सागरी सुरक्षेला स्वदेशी ‘आयएनएस मंगरोल’चे बळ!

SCROLL FOR NEXT