WTC 2023-25 Points Table After Aus vs Pak 3nd Test  
क्रीडा

WTC Points Table 2023-25 | सिंहासन हिसकावलं! ऑस्ट्रेलियाने दोन दिवसात भारताला दिले दोन तगडे धक्के

Kiran Mahanavar

WTC Points Table 2023-25 Update : पाकिस्तानविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आठ गडी राखून विजय मिळवला. सिडनी येथे खेळवण्यात आलेला सामना जिंकून पाकिस्तानी संघाचा मालिकेत 3-0 असा पराभव केला.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 ​​च्या गुणतालिकेतही कांगारू संघाला याचा फायदा झाला. ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

दोन दिवसांत ऑस्ट्रेलियाने भारताला दोन तगडे धक्के दिले आहेत. याआधी शुक्रवारी (5 जानेवारी) त्याने भारताला मागे टाकत आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिले स्थान मिळवले होते. आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या गुणांच्या टक्केवारीत फारसा फरक नाही. ऑस्ट्रेलियाचे 56.25 टक्के गुण आहेत. तर भारताचे 54.16 टक्के गुण आहेत.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. शान मसूदचा कर्णधार असलेला संघ सहाव्या स्थानावर आहे. पाक संघाच्या टक्केवारीत मोठी घसरण झाली आहे. पाकिस्तानची टक्केवारी यापूर्वी 45.83 होता. आता ते 36.66 वर आले आहेत.

भारत आणि ऑस्ट्रेलिया हे संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळले आहेत. टीम इंडियाने दोन्ही फायनल खेळल्या आहेत. मात्र, तो जिंकलेला नाही. एकदा न्यूझीलंडविरुद्ध आणि एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी संघ एकदाही फायनलमध्ये पोहोचलेला नाही.

भारताला पहिले स्थान मिळवण्याची संधी

भारतीय संघाला 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून बदला घेण्याची संधी असेल. ते कांगारू संघाला ICC क्रमवारीत तसेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मागे टाकू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT