IPL sakal
क्रीडा

WTCFinals : जागतिक कसोटी स्पर्धेच्या अजिंक्यपदाची गदा ऑस्ट्रेलियाच्या हाती

दोन वर्षांपूर्वी जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून भारताला हार पत्करावी लागली होती.

सुनंदन लेले

WTCFinals - ओव्हल भारतीय फलंदाजांच्या हाराकिरीमुळे जागतिक कसोटी स्पर्धेतील अंतिम सामन्यात पुन्हा एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने रविवारी भारताचा दुसरा डाव २३४ धावांमध्ये गुंडाळला आणि २०९ धावांनी दणदणीत विजय साकारला.

दोन वर्षांपूर्वी जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडकडून भारताला हार पत्करावी लागली होती. एकदिवसीय विश्‍वकरंडक, टी-२० विश्‍वकरंडक, चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या स्पर्धा जेतेपदांवर मोहोर उमटवणाऱ्या ऑस्ट्रेलियाने आता जागतिक कसोटी स्पर्धेच्या अजिंक्यपदावर रुबाबात मोहोर उमटवली.

क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते, या भाबड्या आशेने भारतीय संघाचे पाठीराखे ओव्हल मैदानाला येऊन धडकले होते. खेळणे आणि दडपणाखाली खेळणे यातला फरक काय असतो हेच जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पाचव्या दिवशी दिसून आले.

ऑस्ट्रेलियन संघाकडून मिळालेल्या ४४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायच्या प्रयत्नात भारतीय संघाला चांगलीच धाप लागली. दडपणाखाली भारतीय फलंदाजांनी चुका केल्या. पाचव्या दिवशी उपाहाराअगोदर भारताचा डाव २३४ धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलियन संघाने पाच दिवस सातत्यपूर्ण खेळ करून कसोटी अजिंक्यपदावर आपला हक्क सांगितला. पहिल्या डावात १६३ धावांची देदीप्यमान खेळी साकारणारा ट्रॅव्हीस हेड या कसोटी सामन्याचा मानकरी ठरला.

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची नाबाद जोडी भारतीय संघाला आशेचे किरण दाखवत होती. पहिला अर्धा तास दोघा नाबाद फलंदाजांनी उत्तम प्रतिकार केला. जोडी स्थिरावली वाटत असताना ४९ धावांवर खे‍ळणाऱ्या विराट कोहलीने स्कॉट बोलंडचा खूप बाहेरचा चेंडू मारण्याची चूक केली. दुसऱ्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या स्टीव्ह स्मिथने उजवीकडे सूर मारत झेल पकडला.

त्याच क्षणी पराभवाची वाटचाल चालू झाली. स्कॉट बोलंडने पाठोपाठ रवींद्र जडेजाला टप्पा पडून बाहेर जा‍णाऱ्या चेंडूवर झेलबाद केले. जेव्हा ४६ धावांवर खेळून किल्ला लढवणारा अजिंक्य रहाणे बाद झाला तेव्हा उरल्यासुरल्या आशा संपल्या.

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी हाती आलेली संधी साधत शार्दूल ठाकूर याच्यासह उरलेल्या ४ फलंदाजांना बाद करून २०९ धावांचा भलामोठा विजय हाती घेतला. पहिल्या डावाप्रमाणेच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी आपापली कामगिरी चोख पार पाडली. कोणीही पाच बळी मिळवले नसले तरी सगळ्यांनी भारतीय फलंदाजांवरचे दडपण क्षणभरही कमी होऊन दिले नाही.

चांगली फलंदाजी, टिच्चून गोलंदाजी आणि त्याला मिळालेली झेल पकडण्याची साथ असा परिपूर्ण खेळ पाचही दिवस सादर केल्याने ऑस्ट्रेलियन संघ भारतापेक्षा सरस ठरला हे विशेष.नॅथन लायनने भारताचा शेवटचा फलंदाज महंमद सिराजला बाद केले आणि ऑस्ट्रेलियन संघाने ओव्हल मैदानावर विजयोत्सव साजरा केला. भारतीय संघाचे आयसीसी स्पर्धा जिंकण्याचे मिशन अधुरेच राहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election 2025: बिहार निवडणूक! एनडीएमध्ये नाराजी? 'या' दोन पक्षांनी व्यक्त केली खदखद

Vaijapur News : जिल्हा परिषद, पंचायत समिती आरक्षणामुळे काहींचे स्वप्न राहणार अधुरे; काहींचे चेहरे खुलले

Uttar Pradesh : CM योगींकडून प्रेरणा घेऊन उभी केली ‘मोरिंगा आर्मी’ PM मोदींनीही केलं लखनऊमधील महिलेचे कौतूक

Pune News : अनधिकृत फ्लेक्सचा दंड नसल्याची उमेदवारांना घ्यावी लागणार एनओसी

Wagholi News : कामगारांकडून बेदम मारहाणीत एका चोरट्याचा मृत्यू; ११ जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT