luke harper died 
क्रीडा

धक्कादायक! WWE सुपरस्टार Luke Harper चे अवघ्या 41 व्या वर्षी निधन; माहीत करुन घ्या मृत्यूचे कारण

सकाळ ऑनलाईन टीम

नवी दिल्ली: WWE च्या  रिंगमध्ये नेहमीच प्रतिस्पर्ध्यांना मात देणाऱ्या ल्यूक हार्पर आयुष्याची लढाई हरला आहे. डब्ल्यूडब्ल्यूई (WWE) सुपरस्टार आणि माजी आयसी चॅम्पियन ल्यूक हार्पर (Luke Harper) यांचे वयाच्या ४१ व्या वर्षी निधन झालं आहे. ल्यूक हार्पर फुफ्फुसाच्या आजाराने दीर्घकाळ त्रस्त होता. ज्यावर त्याचे हॉस्पिटलमध्ये उपचारही सुरू होते.

पत्नीने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली माहिती-
ल्यूक हार्परच्या निधनाची बातमी त्याची पत्नी अमांडा (Amanda) हिने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली. लूकचे फुफ्फुसाच्या संसर्गामुळे निधन झाले आहे. डब्ल्यूडब्ल्यूईचा माजी कुस्तीपटू जोनाथन ह्यूबरला (Jonathan Huber) ब्रॉडी ली (Brodie Lee) म्हणून ओळखले जात होतं.

ल्यूक हार्परची पत्नी अमांडा (amanda) हिने पोस्टमध्ये लिहिले, "माझा जिवलग मित्र आज गेला. मला हे शब्द कधीच लिहायचे नव्हते. माझं हृदय तुटलं आहे. त्याने जगाकडे आश्चर्यकारक नजरेने पाहिलं, पण तो माझा जिवलग मित्र, माझा नवरा आणि खूप चांगला पिताही होता"

ल्यूक हार्परच्या मृत्यूने चाहते हळहळ व्यक्त करत आहेत. ल्यूकचे रिंगच्या बाहेर सगळ्या प्रतिस्पर्ध्यांसोबत चांगले मैत्रीचे संबंध होते. भारतातही ल्यूकचे मोठे चाहते आहेत.

(edited by- pramod sarawale)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात खळबळजनक घटना ! जिम मालकावर चार अल्पवयीन मुलांनी झाडल्या गोळ्या, धक्कादायक कारण आले समोर

FIFA World Cup 2026: अमेरिकेत युरोपियन क्रांतीची चाहूल! फ्रान्स, स्पेन, इंग्लंडमध्ये रस्सीखेच, तर अर्जेंटिना, ब्राझीलचा लागणार कस

India Energy Supply : भारतावर नवं मोठं संकट ! एलपीजीसह पेट्रोल- डिझेलवर होणार परिणाम; कृषी क्षेत्रालाही बसणार फटका

Cockroach Janata Party : अभिजीत दिपके नागपुरात आंदोलन करणार, तारीख ठरली; परवानगीची प्रक्रिया सुरू

Latest Marathi News Live Update : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो 15 जुलैपासून बाणेर स्टेशनपर्यंत सुरू होणार

SCROLL FOR NEXT