yashasvi jaiswal abused west indies player sakal
क्रीडा

VIDEO: शतक झळकावल्यानंतर यशस्वी जैस्वालला राग आला, मैदानातच वेस्ट इंडिजच्या खेळाडूला केली शिवीगाळ

Kiran Mahanavar

Wi vs Ind 1st Test Yashasvi Jaiswal VIDEO : यशस्वी जैस्वालने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटची उत्तम सुरुवात केली आहे. आता त्याची नजर पहिल्या द्विशतकाकडे आहे. आतापर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला पदार्पणाच्या कसोटीत ही कामगिरी करता आलेली नाही.

डॉमिनिका येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीबद्दल बोलायचे झाल्यास, टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 2 बाद 312 धावा केल्या आहेत. यशस्वी 143 धावा केल्यानंतरही खेळत आहे. कर्णधार रोहित शर्मानेही 103 धावांची खेळी केली. वेस्ट इंडिजने पहिल्या डावात 150 धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला 162 धावांची महत्त्वाची आघाडी मिळाली आहे.

यशस्वी जैस्वालचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो आणि विराट कोहली एक रन घेण्यासाठी धावले. यादरम्यान एक खेळाडू यशस्वीच्या समोर आला. त्याने नाव घेतले नसले तरी त्याच्यासमोर गम वाल केमार रोच येताना दिसत आहे. यानंतर जैस्वालला त्याला शिवीगाळ करत विराट कोहलीला सांगत आहे की तो समोर येत आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेत एकूण 2 सामने खेळल्या जाणार आहेत. फिरकी खेळपट्टी पाहता टीम इंडिया पहिल्या कसोटीत चांगल्या स्थितीत पोहोचली आहे. पहिल्या डावात ऑफस्पिनर आर अश्विनने 5 तर डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले.

हे दोन्ही गोलंदाज दुसऱ्या डावातही वेस्ट इंडिजच्या फलंदाजांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्ध सलग 8 कसोटी मालिका जिंकली आहे. त्यांची नजर 9व्या विजयावर आहे.

ही मालिका भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या नवीन हंगामातील पहिली मालिका आहे. टीम इंडिया चॅम्पियनशिपच्या पहिल्या दोन मोसमात अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली, पण पराभव पत्करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT