Yashasvi Jaiswal Marathi News  sakal
क्रीडा

Yashasvi Jaiswal Ind vs Eng : १९ चौकार ७ षटकार... यशस्वी द्विशतक ठोकून केला नवा विक्रम, गावसकर-कांबळी अन् आता जैस्वाल!

Yashasvi Jaiswal Ind vs Eng : गावसकर-कांबळी अन् आता जैस्वाल! यशस्वी द्विशतक ठोकून केला नवा विक्रम

Kiran Mahanavar

Yashasvi Jaiswal Double Century : भारतीय संघाचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने आपल्या करिअरची दमदार सुरुवात केली आहे. टीम इंडियाच्या स्टारने अवघ्या सहाव्या कसोटी सामन्यात पहिले कसोटी द्विशतक ठोकले आहे.

यशस्वी जैस्वालने 277 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले आहे. कसोटीत भारतासाठी द्विशतक झळकावणारा तो तिसरा सर्वात तरुण भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी विनोद कांबळीने वयाच्या 21व्या वर्षी दोन द्विशतके झळकावली होती. त्याचवेळी सुनील गावसकर यांनी वयाच्या 21व्या वर्षी द्विशतक झळकावले होते. आता यशस्वीने वयाच्या 22 व्या वर्षी ही कामगिरी केली आहे.

पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर दुसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाज दमदार पुनरागमन करतील असे वाटत होते. मात्र जैस्वाल सोडला तर एकाही फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. अशा परिस्थितीत जैस्वालची ही खेळी सर्वात खास आहे. यशस्वीने भारतीय भूमीवर पहिले शतक झळकावले आणि आता त्याच शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर केले आहे. या खेळीदरम्यान जैस्वालच्या बॅटमधून 19 चौकार आणि 7 षटकार आले. तो 290 चेंडूत 209 धावा करून बाद झाला.

यशस्वीचा पदार्पणात धमाका...!

गेल्या वर्षी जुलैमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना यशस्वी जैस्वालने 171 धावांची खेळी खेळून आपल्या कारकिर्दीची शानदार सुरुवात केली होती. 387 चेंडूंचा सामना करत या तरुणाने 16 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने ही संस्मरणीय खेळी खेळली होती. या सामन्याच्या दुसऱ्या डावातही यशस्वीने अर्धशतक झळकावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

आमिर खान यांना 'सितारे ज़मीन पर' च्या प्रचंड यशानिमित्त देशभरातील एग्झिबिटर्सकडून विशेष सन्मान!

कॅन्सरग्रस्त दीपिका कक्करला भेटायला पोहोचली मराठमोळी सोनाली कुलकर्णी; दोघींचा नेमकं नातं काय?

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

SCROLL FOR NEXT