Yashasvi Jaiswal Century In Debut Test Match  esakal
क्रीडा

Yashasvi Jaiswal : पदार्पणातच शतकी धमाका! यशस्वी आता गब्बर अन् पृथ्वीच्या पंक्तीत तरी जपलं वेगळेपण

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Jaiswal Century In Debut Test Match : भारताला एक डावखुरा सलामीवीर मिळाला आहे. अवघ्या 21 वर्षाच्या यशस्वी जैसवालने आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात शतकी खेळी करत कसोटी संघातील आपली दावेदारी अजून मजबूत केली.

यशस्वी जैसवाल आता भारताकडून कसोटीत पदार्पणातच शतकी खेळी करणारा तिसरा सलामीवीर ठरला आहे. यापूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी आपल्या पदार्पणाच्या कसोटीतच शतकी खेळी केली होती.

शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरूद्ध पदार्पणातच 187 धावांची तडाखेबाज खेळी केली होती. तर पृथ्वी शॉने वेस्ट इंडीज विरूद्ध 134 धावांची नाबाद खेळी केली होती. मात्र या दोघांनीही आपले कसोटी पदार्पणातील शतक हे भारतात खेळताना ठोकले होते. मात्र यशस्वी जैसवालने आपले पदार्पणातील शतक हे परदेशात, वेस्ट इंडीजमध्ये ठोकले आहे. (West Indies Vs India 1st Test Day 2)

यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्मा यांनी दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात सावध फलंदाजी केली. त्यांनी आधी शतकी आणि त्यानंतर हीच भागीदारी दीडशतकाच्या पार नेली. या जोडीने दुसऱ्या सत्रात आपल्या धावांचा वेग वाढवला.

या दोघांची भागीदारी 160 धावांच्या पार गेल्यानंतर एक इतिहास रचला गेला. वेस्ट इंडीजमध्ये भारताकडून सर्वात मोठी सलामी भागीदारी रचण्याचा विक्रम रोहित आणि यशस्वीने आपल्या नावावर केला.

रोहित आणि यशस्वीने ही भागीदारी 200 च्या पार पोहचवले. रोहित - यशस्वी जोडीने अजून एक विक्रम पादाक्रांत केला. त्यांनी भारताकडून वेस्ट इंडीजविरूद्ध सर्वात मोठी सलामी भागीदारी रचणाऱ्या विरेंद्र सेहवाग आणि वसिम जाफर यांचा विक्रम मोडला. या दोघांनी 201 धावांची सलामी दिली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Jallianwala Bagh Massacre : रक्तरंजित इतिहासाला १०७ वर्षे पूर्ण; १६०० हून अधिक निष्पापांचा बळी घेणाऱ्या नरसंहाराची कहाणी

Pandharpur : तरुणीने स्वत:च अ‍ॅसिड ओतून घेतलं, हल्ल्याचा रचला बनाव; कारण आलं समोर

Pune Summer Heat : पुणे शहरात उन्हाचा तडाखा वाढला; बुधवारी ‘यलो अलर्ट’, तापमान पाऱ्याची चाळिशीकडे झेप

RCB संघ मुंबईवरील विजयानंतरही तिसऱ्या क्रमांकावरच; प्रत्येक संघाच्या ४ सामन्यांनंतर कशी आहे Points Table ची स्थिती

SCROLL FOR NEXT