Yashasvi Jaiswal  esakal
क्रीडा

Yashasvi Jaiswal : 6,6,6,6,6... यशस्वीचा चीनमध्येही धडाका, 22 चेंडूत ठोकले अर्धशतक

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Jaiswal : एशियन गेम्समधील आपल्या पहिल्याच सामन्यात भारतीय पुरूष क्रिकेट संघाने दादागिरी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेल्या भारताने 10 व्या षटकातच आपले शतक धावफलकावर लावले.

भारताचा सलामीवीर यशस्वी जैसवालने तर तुफानी तडाखे दिले. यशस्वी जैसवालने 22 चेंडूत अर्धशतक ठोकले. या अर्धशतकात 5 षटकार आणि 5 चौकारांचा समावेश होता. त्याच्या जोडीला असलेल्या ऋतुराजने एक बाजू लावून धरली होती.

एशियन गेम्स 2023 मध्ये पुरूष क्रिकेट क्रीडा प्रकारात भारतीय संघ सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार आहे. महिला संघाने सुवर्ण पदकाची कमाई करत आपला दबदबा सिद्ध केला. आजपासून पुरूष संघाने आपली सुवर्ण पदक पटकावण्याची मोहीम सुरू केली.

नेपाळविरूद्धच्या पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संथ खेळपट्टीवर नवीन चेंडूवर ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जैसवाल यांनी 10 षटकात शतकी सलामी दिली. यात सर्वात मोठा वाटा हा यशस्वी जैसवलाचा होता. त्याने 22 चेंडूतच अर्धशतक ठोकले.

मात्र 10 षटकानंतर भारताचा डाव घसरला. 23 चेंडूत 25 धावा करणाऱ्या ऋतुराजने आपली धावगती वाढवण्यास सुरूवात केली मात्र त्याला दिपेंद्र सिंहने बाद करत भारताला पहिला धक्का दिला.

103 धावांवर पहिली विकेट गेल्यानंतर भारतीय संघाच्या मधल्या फळीने देखील हाराकिरी केली. तिलक वर्मा अवघ्या 2 धावांची भर घालून परतला तर जितेश शर्माला देखील संधीचं सोनं करता आलं नाही. तो 5 धावा करून बाद झाला.

दुसऱ्या बाजूने सेट झालेला यशस्वी जैसवाल 200 च्या स्ट्राईक रेटने धावा करण्यास सुरूवात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT