yashasvi jaiswal
yashasvi jaiswal 
क्रीडा

Yashasvi Jaiswal : मुंबईच्या खेळाडूचे तुफानी द्विशतक! ठोठावले टीम इंडियाचे दार

Kiran Mahanavar

yashasvi jaiswal : मुंबईचा २१ वर्षीय युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल व बंगालचा अनुभवी फलंदाज अभिमन्यू इस्वरन यांनी इराणी करंडकाचा पहिला दिवस गाजवला. यशस्वी याने २१३ धावांची आणि अभिमन्यू याने १५४ धावांची खेळी केल्यामुळे शेष भारताने मध्य प्रदेशाविरुद्ध पहिल्या दिवसअखेरीस ३ बाद ३८१ धावा फटकावल्या.

शेष भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. अवेश खानने मयांक अगरवालला २ धावांवर बाद करीत शेष भारताला ७ धावांवरच धक्का दिला; पण यानंतर अभिमन्यू व यशस्वी या जोडीने मध्य प्रदेशाच्या गोलंदाजांचे आव्हान लीलया परतवून लावले. यशस्वीने फिरकी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. ऑफस्पिनर सारांश जैन (२४ षटकांत १०३ धावा) व डावखुरा फिरकी गोलंदाज कुमार कार्तिकेय (२० षटकांत ९० धावा) या दोन फिरकी गोलंदाजांचा खरपूस समाचार घेण्यात आला. दोन्ही फिरकी गोलंदाजांना अचूक टप्प्यात गोलंदाजी टाकता आली नाही. त्यामुळे शेष भारताकडून बुधवारी ४७ चौकार व पाच षटकारांचा पाऊस पाडण्यात आला.

यशस्वी व अभिमन्यू या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३७१ धावांची संस्मरणीय भागीदारी रचली. तसेच आता सर्वात कमी वयामध्ये (२१ वर्षे) इराणी करंडकात द्विशतक झळकावणारा फलंदाज म्हणून यशस्वीचे नाव घेतले जाणार आहे. शिवाय प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वेगवान एक हजार धावांचा टप्पाही त्याच्याकडून ओलांडण्यात आला आहे, हे विशेष.

नवा उच्चांक

  • यशस्वी जयस्वाल याने २१व्या वर्षी इराणी करंडकात द्विशतक झळकावण्याची किमया करून दाखवली. याप्रसंगी सर्वांत कमी वयामध्ये या स्पर्धेत द्विशतक झळकावणारा तो फलंदाज ठरला आहे.

  • यशस्वी जयस्वाल याने २०२२-२३ मोसमातील प्रथमश्रेणी क्रिकेटमधील १७ डावांमध्ये एक हजार धावांचा टप्पा ओलांडला.

  • यशस्वी जयस्वाल व अभिमन्यू इस्वरन या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३७१ धावांची भागीदारी रचली.

विश्‍वास सार्थ ठरवला

यंदाच्या रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये यशस्वी जैसवालला ठसा उमटवता आला नाही. पाच सामन्यांमधून त्याने फक्त ३१५ धावा फटकावल्या. रणजी क्रिकेट स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत नसतानाही यशस्वीची शेष भारतात निवड करण्यात आली.

संक्षिप्त धावफलक ः शेष भारत - ८७ षटकांत ३ बाद ३८१ धावा (मयांक अगरवाल २, अभिमन्यू इस्वरन १५४ - २४० चेंडू, १७ चौकार, २ षटकार, यशस्वी जयस्वाल २१३ - २५९ चेंडू, ३० चौकार, ३ षटकार, अवेश खान २/५१) वि. मध्य प्रदेश.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT