Yashasvi Jaiswal esakal
क्रीडा

Yashasvi Jaiswal : यशस्वीची पहिल्याच सामन्यात ऐतिहासिक कामगिरी; शतक ठोकून केला मोठा विक्रम

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Jaiswal : भारतीय पुरूष क्रिकेट संघातील सलामीवीर यशस्वी जैसवालने एशियन गेम्समधील आपल्या पहिल्याच सामन्यात शतकी तडाखा दिला. तो भारताकडून एशियन गेम्समध्ये शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. भारतीय पुरूष क्रिकेट संघ पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये सहभागी झाला आहे. त्यात पहिल्याच सामन्यात यशस्वी जैसवालने 48 चेंडूत अर्धशतकी खेळी केली.

भारताचा सलामीवीर यशस्वी जैसवालने एशियन गेम्समधील आपल्या पहिल्याच सामन्यात नेपाळच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने संथ खेळपट्टीवर नवीन चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला. ऋतुराजसोबत त्याने पॉवर प्लेमध्ये जवळपास 10 च्या सरासरीने धावा ठोकल्या. त्याने 22 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. यानंतर पुढच्या 26 चेंडूत आपले शतक देखील पूर्ण केले.

यशस्वीने आपल्या शतकी खेळीत 7 षटकार आणि 8 चौकार मारत 15 चेंडूतच 74 धावा केल्या. मात्र यशस्वीला साथ देणाऱ्या फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. ऋतुराज 25 धावा करून बाद झाला. तर तिलक वर्मा 2 आणि जितेश शर्मा 5 धावाच करू शकला.

मात्र यशस्वी जैसवाल 49 चेंडूत 100 धावा करून बाद झाल्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये शिवम दुबे आणि रिंकू सिंहने तडाखेबाज फलंदाजी करत भारताला 20 षटकात 4 बाद 202 धावांपर्यंत पोहचवले. रिंकू सिंहने 15 चेंडूत 37 तर शिवम दुबेने 19 चेंडूत 25 धावा केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT