Yashasvi Jaiswal  esakal
क्रीडा

Yashasvi Jaiswal IND vs ENG : इतर फलंदाज फेल, जैस्वालच 'यशस्वी' कसा झाला...?

Yashasvi Jaiswal IND vs ENG : यशस्वी जैस्वालच्या यशाचं रहस्य त्याच्या मानसिकतेत आहे.

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Jaiswal : दुसऱ्या कसोटीत यशस्वी जैसवालने पहिल्या दिवशी नाबाद 179 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवशी 6 बाद 336 धावापर्यंत मजल मारली. यशस्वी जर पहिल्या दिवशी मोठी खेळी करण्यात यशस्वी झाला असला तरी भारताचे इतर फलंदाज मात्र अर्धशतकही ठोकण्यात अपयशी ठरले.

भारताचे रथी महारथी फेल होत असताना यशस्वीनं असं काय वेगळं केलं त्यामुळे तो जवळपास द्विशतकापर्यंत पोहचू शकला? पहिला दिवस संपल्यानंतर यशस्वीनेच आपल्या या मोठ्या खेळीचं रहस्य सांगितलं.

यशस्वी जैस्वाल म्हणाला की, 'मी आज प्रत्येक सत्र खेळून काढण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळी ते गोलंदाजी चांगली करत होते त्यावेळी मी तो स्पेल फक्त खेळून काढण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला खेळपट्टी थोडी फ्रेश आणि ओलसर होती. त्यामुळे चेंडू स्पिन आणि बाऊन्स होत होता. याचबरोबर थोडा सीम देखील होत होता.'

यशस्वी पुढे म्हणाला की, 'मी खराब चेंडूवर धाव करण्याची रणनिती अवलंबली. याचबरोबर शेवटपर्यंत खेळण्याचा निर्धार केला होता. मला ही मोठी खेळी द्विशतकात रूपांतरित करायला नक्कीच आवडेल. मला संघासाठी शेवटपर्यंत खेळायला आवडेल.'

उद्याच्या प्लॅनिंगबद्दल यशस्वी जैस्वाल पुढे म्हणाला की, 'मी सध्या उद्या फ्रेश राहण्यासाठी काय करता येईल ते करतोय. खेळपट्टी थोडी वेगळी खेळत आहे. सकाळी त्यात थोडा ओलावा असतो आणि नंतर ती खेळपट्टी सेट होते. जुन्या चेंडू एखाद्यावेळी उसळी घेतो.'

रोहित आणि राहुलबद्दलही यशस्वी भरभरून बोलला. तो म्हणाला की, 'राहुल सर आणि रोहित भाई मला वेळोवेळी आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी मला तुझे शतक मोठ्या खेळीत रूपांतरित कर, शेवटपर्यंत खेळ असं सांगितलं आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT