Yashasvi Jaiswal  esakal
क्रीडा

Yashasvi Jaiswal : 78 कोटींच्या घरात राहणाऱ्या क्रिकेटपटूला भेटल्यानंतर यशस्वी जैसवालचे आयुष्यच बदलून गेलं

अनिरुद्ध संकपाळ

Yashasvi Jaiswal : मुंबईचा झुंजार फलंदाज यशस्वी जैसवालला वयाच्या 21 व्या वर्षी भारताकडून कसोटी पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. वेस्ट इंडीज विरूद्धच्या पहिल्या कसोटीत तो कर्णधार रोहित शर्माच्या साथीने सलामीला येणार असल्याचे संकेत खुद्द रोहितनेच दिले आहेत. (Yashasvi Jaiswal News)

यशस्वी जैसवालसाठी गेला आयपीएल हंगाम हा एका स्वप्नासारखा गेला. त्याने रणजी ट्रॉफी आणि देशांतर्गत इतर क्रिकेट स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. त्याचे फळ आता त्याला मिळत आहे.

19 वर्षाखालील वर्ल्डकप विजेत्या संघातील प्रतिभावान खेळाडू, आयपीएल आणि आता भारताचा कसोटीपटू असा प्रवास करणाऱ्या जैसवालचं नशीब हे भारताच्या एका महान क्रिकेटपटूच्या 78 कोटींच्या घरात गेल्यानंतर बदललं.

मास्टर ब्लास्टर व्हाया अर्जुन

हे 78 कोटींचे घर दुसरे तिसरे कोणाचे नसून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे आहे. ज्यावेळी यशस्वी जैसवालचे संघर्षाचे दिवस होते. त्यावेळी सिचनने त्याला एकदा त्याच्या घरी भेटायला बोलवले होते.

बांद्रा येथील पेरी क्रॉस रोडवर असलेल्या या 78 कोटींच्या घरात अर्जुन तेंडुलकरने यशस्वीची भेट त्याच्या वडिलांशी करून दिली होती. यावेळी यशस्वी आणि अर्जुन तेंडुलकर हे दोघेही 19 वर्षाखालील भारतीय संघात निडवले गेले होते. (Yashasvi Jaiswal Meet Sachin Tendulkar)

सचिन तेंडुलकरने यशस्वीसोबत खूपवेळ गप्पा मारल्या होत्या. त्यामुळे यशस्वीचा आत्मविश्वास दुणावला. ही भेट सचिनने आपली ऑटोग्राफ केलेली बॅट देऊन यशस्वीसाठी स्मरणीय केली. यशस्वी या भेटीने इतका भारावून गेला होता की त्याला सचिन सोबत फोटो काढण्याचे भान देखील राहिले नाही. यशस्वीने सचिनची ती स्वाक्षरी असलेली बॅट सांभाळून ठेवली आहे. ती बॅट त्याच्यासाठी प्रेरणेचा एक स्त्रोत आहे.

यशस्वीचे दिवस पालटले

क्रिकेट खेळण्यासाठी पाणीपूरी विकून आणि मैदानावरील टेंटमध्ये राहून दिवस काढणाऱ्या सलामीवीर यशस्वी जैसवालचे दिवस 19 वर्षाखालील वर्ल्डकपमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर पालटले. त्याला आयपीएलचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. त्याला आयपीएल 2020 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून तीन सामने खेळण्याची संधी मिळाली.

त्यानंतर 2021 आणि 2022 मध्ये त्याने 10 - 10 सामने खेळले. मात्र 2023 च्या हंगामात आपल्याला एक बदललेला यशस्वी पहायला मिळाला. त्याने 14 सामन्यात 163.61 च्या सरासरीने 625 धावा केल्या.

मुंबई इंडियन्सविरूद्ध त्याने दमदार शतकी खेळी देखील केली. आता त्याची भारताच्या कसोटी संघात निवड झाली आहे. (Yashasvi Jaiswal In Indian Test Team)

(Sports News In Marathi)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Louvre Museum Robbery : मोनालिसाची पेंटींग असलेल्या म्युझियममध्ये दरोडा, अवघ्या सात मिनिटांत लंपास केले ऐतिहासिक दागिने, कशी झाली चोरी?

No Kings Protest: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निषेधाची आग! नो किंग्ज आंदोलन म्हणजे नेमकं काय? लाखो लोक रस्त्यावर का उतरलेत?

'आता वेळ आलीये कार्यसम्राटांना घरी बसवण्याची...'; नाव न घेता शिंदेसेनेला घणाघाती टोला, ठाण्यात भाजपच्या बॅनरची चर्चा

Vande Bharat Express: मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ६ तास विलंब; प्रवाशांमध्ये संताप

INDW vs ENGW: हिदर नाईटचं शतक अन् इंग्लंडचं भारतासमोर विक्रमी लक्ष्य! गोलंदाजीत दीप्ती शर्मा चमकली

SCROLL FOR NEXT