West Indies Vs India 1st Test Day 2 esakal
क्रीडा

Yashasvi Jaiswal WI vs IND : तब्बल 350 चेंडू खेळून नाबाद! यशस्वीची भूक मोठी; आधी रोहित आता विराटसोबत रचतोय भागीदारी

अनिरुद्ध संकपाळ

West Indies Vs India 1st Test Day 2 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील पहिल्या कसोटीचा दुसरा दिवस यशस्वी जैसवालनं गाजवला. त्याने दुसऱ्या दिवशीचे तीनही सत्र फलंदाजी करत 350 नाबाद 143 धावा केल्या. रोहित शर्माने देखील शतकी (103) खेळी केली. या दोघांनी दिलेल्या 229 धावांच्या सलामीच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवसअखेर 312 धावा केल्या. भारताकडे आता 162 धावांची आघाडी आहे. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी यशस्वी जैसवाल धावांवर 143 तर विराट कोहली 36 धावांवर खेळत होते.

पहिल्या सत्रात संथ मात्र सॉलीड भागीदारी

रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवाल यांनी दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव बिनबाद 80 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. या दोघांनी विंडीजच्या फिरकीपटूंचा चांगला मारा धैर्याने खेळून काढला. या दरम्यान, यशस्वी जैसवालने आपले अर्धशतक पूर्ण केले. (Rohit Sharma News)

रोहित शर्मा त्याला संथ साथ देत आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी आपली भागीदारी शतक पार पोहचवली. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात या जोडीने भारताला 150 च्या जवळ पोहचवले. पहिल्या सत्रात भारताला फक्त 66 धावा करता आल्या होत्या.

दुसऱ्या सत्रात वेग वाढवला

पहिल्या सत्रात सावध फलंदाजी करणाऱ्या यशस्वी आणि रोहितने दुसऱ्या सत्रात धावांची गती वाढवत ही 4 धावा प्रती षटकापर्यंत पोहचवले. या दोघांनी आपली भागीदारी 160 पार पोहचवत वेस्ट इंडीजमध्ये सर्वात मोठी सलामी भागीदारी रचण्याचा विक्रम केला. (Yashasvi Jaiswal Records)

दरम्यान, यशस्वी जैसवाल आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता. त्याने आपले पदार्पणातील शतक पूर्ण केले. तो भारताकडून पदार्पणाच्या कसोटीत शतकी खेळी करणारा तिसरा सलामीवीर ठरला.

याचबरोबर यशस्वी आणि रोहितने वेस्ट इंडीजविरूद्ध सर्वात मोठी सलामी भागीदारी रचण्याचा सेहवाग आणि जाफरचा विक्रम मोडला. यानंतर रोहित शर्माने देखील 221 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मात्र पुढच्या चेंडूवर तो बाद झाला.

अखेर यशस्वी आणि रोहितची 229 धावांची सलामी जोडी फोडण्यात अथनाजेला यश आले. यानंतर आलेल्या शुभमन गिल देखील 6 धावांची भर घालून वारिकनचा शिकार झाला. भारताने दुसऱ्या सत्रात दोन विकेट्स गमावून 99 धावा केल्या. खेळ थांबला त्यावेळी भारताच्या 2 बाद 245 धावा झाल्या होत्या. भारताकडे 95 धावांची आघाडी होती.

तिसऱ्या सत्रात विराटची साथ

भारताने पाठोपाठ दोन विकेट गेल्यानंतर विराट कोहली आणि सेट झालेल्या यशस्वी जैसवाल यांनी तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी रचली. विराटने अडखळत सुरूवात केली. मात्र नंतर त्याने धावांची गती वाढवली. तर यशस्वी जैसवालने शतकावर समाधान न मानता मोठी खेळी करण्याचा प्रयत्न केला.

भारताने दुसऱ्या दिवसअखेर 312 धावा केल्या. भारताकडे आता 162 धावांची आघाडी आहे. दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी यशस्वी जैसवाल धावांवर 143 तर विराट कोहली 36 धावांवर खेळत होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT