India Vs England  esakal
क्रीडा

IND vs ENG : यशस्वीनं दाखवला 'भारतीय जैसबॉल', इंग्लंडविरूद्ध 108 च्या स्ट्राईक रेटनं ठोकलं नाबाद अर्धशतक

अनिरुद्ध संकपाळ

India Vs England 1st Test Day 1 : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडच्या बॅझबॉलचा पुरता बाजा वाजवल्यानंतर यशस्वी जयस्वालने इंग्लंडच्या गोलंदाजांना भारतीय बॅझबॉलची चुणूक दाखवली.

यशस्वी जयस्वालने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तोपर्यंत 70 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. त्याने मालिकेतील पहिल्याच कसोटीत 108 च्या स्ट्राईक रेटने धावा ठोकत भारताला 1 बाद 119 धावांपर्यंत पोहचवले.

विशेष म्हणजे भारताने आपल्या डावाची तुफानी सुरूवात केली. भारताने फक्त 4 षटकात 35 धावा ठोकल्या. तर यशस्वी जयस्वालने 47 चेंडूत अर्धशतक ठोकले.

पहिल्या दिवशी भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज (प्रथम क्षेत्ररक्षण करताना)

  • गौतम गंभीर - झिम्बाब्वेविरूद्ध नाबाद 95 धावा - 2005

  • यशस्वी जयस्वाल - इंग्लंडविरूद्ध नाबाद 76 धावा - 2024

  • केएल राहुल - वेस्ट इंडीजविरूद्ध नाबाद 75 धावा - 2016

इंग्लंडला पहिल्या डावात 246 धावांमध्ये रोखल्यानंतर यशस्वी जयस्वालने भारताला दमदार सुरूवात करून दिली. त्याने 70 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या. तर रोहित शर्मा 24 धावा करून बाद झाला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी भारताच्या 1 बाद 119 धावा झाल्या होत्या. यशस्वीला साथ देणारा शुभमन गिल 14 धावा करून नाबाद राहिला. भारत अजूनही 127 धावा पिछाडीवर आहे.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने झुंजार 70 धावा केल्या. तर भारताकडून अश्विन आणि रविंद्र जडेजाने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

US Iran Conflict: इराणची पाच तेलवाहू जहाजे लक्ष्य; युद्धनौकांवरील हल्ल्यांना अमेरिकेचे प्रत्युत्तर, जॉर्डनमध्येही हल्ले

Vidyanand Bapat : गणेशोत्सवावरील वक्तव्य भोवले? विद्यानंद बापटांना ४८ तासांत माफी मागण्याची नोटीस

Maharashtra Sugarcane: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ऊस गाळपाचा मुहूर्त ठरला; १५ ऑक्टोबरपासून २०२६-२७ चा ऊस गाळप हंगाम सुरू होणार

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

SCROLL FOR NEXT