India Vs West Indies Yashasvi Jaiswal esakal
क्रीडा

Yashasvi Jaiswal : भारताचं भविष्य उज्वल! युवा सलामीवीरांचा विक्रमी धडाका, यशस्वीचे कसोटीनंतर टी 20 मध्येही झोकात पदार्पण

अनिरुद्ध संकपाळ

India Vs West Indies Yashasvi Jaiswal : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील चौथ्या टी 20 सामन्यात भारताने विंडीजचा तब्बल 9 विकेट्स राखून पारभव केला. भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 2 - 2 अशी बरोबरी साधली. आता उद्या (दि. 13) होणाऱ्या पाचव्या सामन्यात मालिकेचा विजेता ठरणार आहे.

भारताकडून यशस्वी जैसवाल आणि शुभमन गिल (Shubman Gill) यांनी 165 धावांची दमदार सलामी दिली. त्यांनी रोहित आणि राहुलच्या भारताकडून टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात मोठी सलामी देण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.

भारताकडून सलामीवीर यशस्वी जैसवालने सर्वाधिक 84 धावा केल्या. त्याचा हा दुसराच टी 20 आंतरराष्ट्रीय सामना आहे. या सामन्यात त्याने 51 चेंडूत नाबाद 84 धावा चोपल्या. त्याने ही खेळी 3 षटकार आणि 11 चौकारांनी सजवली.

वेस्ट इंडीजचे 179 धावांचे आव्हान भारताने 1 फलंदाजाच्या मोबदल्यात 17 व्या षटकात पार केले. सलामीवीर यशस्वी जैसवालने नाबाद 51 चेंडूत 84 धावांची खेळी केली. त्याने सलामीवीर शुभमन गिल सोबत 165 धावांची दमदार सलामी दिली. गिलने 77 धावांची खेळी करत आपला टी 20 मधील फॉर्म पुन्हा मिळला.

वेस्ट इंडीजने चौथ्या टी 20 सामन्यात प्रथम फंलदाजी करत चांगली सुरूवात केली होती. मात्र अर्शदीप सिंग आणि कुलदीप यादव यांनी विंडीजला एका पाठोपाठ एक धक्के दिले. विंडीजची अवस्था 4 बाद 57 अशी झाली असताना शाय होपने 45 धावांची खेळी करत विंडीजला शतकी मजल मारून दिली. त्याला हेटमायर देखील चांगली साथ देत होता.

मात्र ही जोडी युझवेंद्र चहलने फोडली. त्याने होपला 45 धावांवर बाद केले. परंतु सेट झालेल्या हेटमायरने तळातील फलंदाजांच्या साथीने विंडीजला 160 धावांचा आकडा पार करून दिला. हेटमायरने 39 चेंडूत 61 धावा केल्या. शेवटच्या षटकात हेटमायर बाद झाल्यानंतर अकील हुसैनने 15 धावांचे योगदान देत विंडीजला 20 षटकात 8 बाद 178 धावांपर्यंत मजल मारून दिली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत सेनाभवनासमोर राडा! शिवसैनिक पोलिसांच्या ताब्यात, आदित्य-तेजस ठाकरे आक्रमक

CJP Protest Streets Again : "आंदोलन करणार नाही अशी कोणत्याच बॉण्डवर सही केली नाही; पुन्हा रस्त्यावर उतरणार!"; अभिजीत दिपके यांचा थेट इशारा

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

Beed Jeweller Fraud: साेन्याची मोड तपासली, तरी फसवणूक झाली; धारूरच्या सराफाला १७.५० लाखांना गंडा, नेमकं काय घडलं?

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

SCROLL FOR NEXT