क्रीडा

Ind vs Afg : टीम इंडियाच्या प्रिन्सला जयस्वालचा 'यशस्वी' धक्का.... वर्ल्ड कपमधूनही होणार गच्छंती ?

Yashasvi Jaiswal Snatched Shubman Gill’s Position Team India News :

Kiran Mahanavar

IND vs AFG T20 Series 2024 : भारताने अफगाणिस्तानविरुद्धची 3 टी-20 सामन्यांची मालिका जिंकली आहे. या मालिकेत भारताने आतापर्यंत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालने तुफानी खेळी केली आहे.

पहिल्या सामन्यात यशस्वी खेळला नाही, पण मालिकेतील दुसऱ्या सामन्यात तो परतला आणि रोहित शर्मासोबत सलामीला आला. शुभमन गिलच्या जागी यशस्वीचा संघात समावेश करण्यात आला होता. या सामन्यात यशस्वीने अप्रतिम खेळी केली आहे. त्याने अवघ्या 34 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी केली आहे. यावरून शुबमन गिलला आता पुनरागमन करणे कठीण झाल्याचे दिसत आहे.

यशस्वीने दुसऱ्या टी-20 सामन्यात अप्रतिम खेळी केली आहे. त्याने 200 च्या स्ट्राईक रेटने 68 धावांची इनिंग खेळली आहे. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून 5 चौकार आणि 6 षटकारही आले.

अशा परिस्थितीत गिलच्या जागी यशस्वी शुभमन योग्य आहे. गिलच्या जागी त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. पहिल्या टी-20 मध्ये गिलला आपली जागा पक्की करण्याची संधी मिळाली, परंतु त्याच्या बॅटमधून केवळ 23 धावा आल्या. अशा स्थितीत यशस्वीने गिलपेक्षा खूपच चांगला खेळ केला आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेनंतर भारताला वर्ल्ड कप खेळायचा आहे. अशा स्थितीत जून महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये यशस्वीचा भारतीय संघात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. असे झाल्यास शुभमन गिलला संघात खेळणे कठीण होईल.

अशा स्थितीत यशस्वी गिलचे टी-20 मधील स्थान कायमचे हिरावून घेण्याची शक्यता आहे. आता 17 जानेवारीला भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात यशस्वीच्या कामगिरीवरही संघ निवडक विशेष लक्ष देतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT