1983 World Cup Players  File Photo
क्रीडा

1983 World Cup जिंकल्यावर कपिल देव यांना किती पैसे मिळाले होते माहितेय?

कपिल पाजींच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वेस्ट इंडीज संघाच्या वर्ल्ड विजयाच्या हॅटट्रिकवर पाणी फेरलं होते.

सुशांत जाधव

1983 Players Match Fees: भारतीय संघाचे अष्टपैलू खेळाडू आणि माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करुन दाखवली होती. 25 जून 1983 या दिवशी लॉर्ड्सच्या मैदानावर टीम इंडियाने इतिहास रचला होता. त्याकाळात बलाढ्य असलेल्या वेस्ट इंडीज संघाला शह देत भारतीय संघानं पहिला वहिला वर्ल्ड कप (1983 World Cup) जिंकला होता.

कपिल पाजींच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने वेस्ट इंडीज संघाच्या वर्ल्ड विजयाच्या हॅटट्रिकवर पाणी फेरलं होते. भारतीय संघाने मिळवलेला हा विजय वर्षांनुवर्षे आठवला जाईल, असाच आहे. सध्याच्या घडीला बीसीसीआयला जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणून ओळखले जाते. सध्याच्या घडीला रात्रीत करोडपती झालेले खेळाडू आपण पाहिले आहेत. आयपीएलमुळे यात आणखी भर पडलीये. पण, 1983 मध्ये ज्यावेळी क्रिकेटच्या मैदानात टीम इंडियाने इतिहास रचला त्यावेळी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंना माफक मानधन (1983 Players Match Fees) मिळाले होते.

कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघात मोहिंदर अमरनाथ, सुनील गावसकर, कृष्णामाचारी श्रीकांत, यशपाल शर्मा, संदीप पाटील, कीर्ती आजाद, रॉजर बिन्नी, मदनलाल, सैय्यद किरमानी, बलविंदर सिंह संधू, दिलीप वेंगसरकर, रवि शास्त्री या खेळाडूंनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. संघ व्यवस्थापनाची जबाबदारी ही बिशनसिंग बेदी यांनी पार पाडली होती. भारतीय संघाचे व्यवस्थापक होते. भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि व्यवस्थापनाला तीन दिवसांसाठीचा भत्ता 600 रुपये आणि मॅच फीच्या स्वरुपात 1500 रुपये असे एकूण 2100 रुपये देण्यात आले होते.

सध्याच्या घडीला खेळाडूंना मिळते कोट्यवधीचं मानधन

सध्याच्या घडीला ए प्लस, ए, बी आणि सी गटात खेळाडूंची वर्गवारी करण्यात येते. जे खेळाडू ए प्लस गटात मोडतात त्यांना वर्षाला सात कोटी रुपये मानधन मिळते. विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रोहित शर्मा या तिघांचा या गटात समावेश आहे. ए गटातील खेळाडूंना 5 कोटी, बी गटातील खेळाडूंना 3 कोटी आणि सी गटातील खेळाडूंना 1 कोटी मानधन मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

दारुबंदीसाठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीने शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

Latest Marathi News Live Update : पुण्यात रिमझिम पावसानेच झाड कोसळलं

SCROLL FOR NEXT