Magnus Carlsen Garry Kasparov  esakal
क्रीडा

Magnus Carlsen : जेव्हा 13 वर्षाचा कार्लसन माजी विश्वविजेत्या गॅरी कॅसपोर्व्हसोबत खेळताना होतो बोअर...

अनिरुद्ध संकपाळ

Magnus Carlsen Garry Kasparov : बुद्धीबळाच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला सध्या भारताचा 18 वर्षाचा प्रग्नानंद कडवे आव्हान देत आहे. सध्या खिखरावर असलेल्या कार्लसनला जर कोणी टक्कर देऊ शकतो तो फक्त प्रग्नानंदच!

अझरबैजानमधील बाकू येथे सुरू असलेल्या बुद्धीबळ विश्वचषक स्पर्धेत प्रग्नानंद आणि कार्लसन हे दोघे अंतिम फेरीत पोहचले. फायनल सामन्यातील दोन्ही क्लासिक राऊंड गेम हे ड्रॉ झाले. त्यामुळे वर्ल्डकप विजेता हा रॅपिड राऊंडनंतरच निश्चित होणार आहे.

सध्या प्रग्नानंद जसा कार्लसनला कडवी टक्कर देत आहे. तशाच प्रकारचा दबदबा कार्लसनने गॅरी कॅसप्रोव्हविरूद्ध निर्माण केला होता. कार्लसनने अवघ्या 13 व्या वर्षी माजी विश्वविजेत्या कॅसप्रोव्हला चांगलेच झुंजवले होते. या सामन्यात कार्लसन हा आपली चाल खेळून दुसऱ्या खेळाडूंचा खेळ पाहणे, सॉफ्ट ड्रिंक्स घेणे, पुस्तकाची पानं पलटणे असले उद्योग करत होता. त्यावेळीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

हा प्रसिद्ध सामना 2004 मध्ये झाला होता. त्यावेळी मॅग्नस कार्लसन हा अवघ्या 13 वर्षाचा होता. त्याने गॅरी कॅसप्रोव्हविरूद्धचा सामना ड्रॉ करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यावेळीचा हा व्हिडिओ प्रिन्स ऑफ चेस या नावाने चांगलाच व्हायरल झाला होता. त्यावेळी मॅग्नस हा सर्वात तरूण ग्रँड मास्टर होता.

त्याचा सामना माजी विश्वविजेत्या गॅरी कॅसप्रोव्हविरूद्ध झाला होता. त्यावेळी कासप्रोव्ह हा टेबलवर उशिरा पोहचला होता. त्यामुळे मॅग्नसला वाट पहावी लागली होती. त्यावेळी मॅग्नस म्हणाला होता की, 'मी ज्यावेळी कॅसप्रोव्हची वाट पाहत होतो त्यावेळी मी विचार करत होतो की, तो लवकर यावा त्यानंतर मी शांत राहण्याचा प्रयत्न करू शकेन.'

कॅसप्रोव्हने यापूर्वी इतक्या छोट्या मुलासोबत सामना खेळला नव्हता. सामन्यादरम्यान, कार्लसन हा सॉफ्ट ड्रिक्स घेताना, पुस्तकाची पानं पलटताना दिसत होता. तो आजूबाजूला सुरू असलेल्या सामन्यात देखील डोकावताना दिसत होता.

कॅसप्रोव्ह आला आणि सामना सुरू झाला. मॅग्नसने आपली पहिली चाल खेळली. त्यानंतर सामना खूप रंगतदार स्थितीत पोहचला होता. दोन्ही खेळाडूंना खूप विचार करून चाल खेळावी लागल होती. हा रॅपिड चेस गेम असल्याने वेळेचेही बंधन होते. मॅग्नस हा आपला वेळ घेत होता मात्र माजी वर्ल्ड चॅम्पियनला सातत्याने आव्हान देत होता.

अखेर हा ऐतिहासिक सामना ड्रॉ झाला. जरी सामना ड्रॉ झाला असला तरी कार्लसन याच्यासाठी हा विजयच होता. सामन्यानंतर कॅसप्रोव्ह घाई गडबडीत आपला कोट घेऊन हॉलमधून बाहेर पडला. मात्र 13 वर्षाच्या ग्रँड मास्टरने आपल्या दैदिप्यमान कारकिर्दीची सुरूवात केली होती.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शहांचा निरोप चंद्रकांत दादांनी मोहोळना दिला, जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द; शिंदेंना शब्द दिल्यानं धंगेकर गप्प, काय घडलं?

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार 1500 रुपये, कधी जाणून घ्या?

Solapur News: आकडे पाहून सगळेच म्हणाले, आँ एवढा पाऊस कधी झाला?; मदतीसाठी बहाद्दरांनी पाडला १९९ मि.मी. पाऊस..

Solapur Accident: 'पाच कार एकमेकांवर आदळून विचित्र अपघात'; गर्भवती महिला जखमी; सोलापूर पुणे महामार्गावर घटना..

अखेर जैन बोर्डिंगचा जमीन खरेदी व्यवहार रद्द, गोखले बिल्डर्सचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT