Archer Parth Salunkhe  esakal
क्रीडा

Archer Parth Salunkhe : सुवर्ण पदकाचा वेध घेत इतिहास रचणारा साताऱ्याचा आर्चर 'पार्थ' आहे तरी कोण?

अनिरुद्ध संकपाळ

Archer Parth Salunkhe : आर्चरी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या रिकर्व श्रेणीत सुवर्ण पदक जिंकणारा पार्थ साळुंखे हा भारताचा पहिला पुरूष आर्चर ठरला आहे. भारताने युवा आर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 11 पदके पटाकवली आहेत. भारताची ही युवा अर्चरी वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. (Youth Archer World Championship)

रविवारी महाराष्ट्राच्या 19 वर्षाच्या पार्थ साळुंखेने 21 वर्षाखालील पुरूष रिकर्व एकेरीच्या अंतिम सामन्यात कोरियाच्या आर्चरला पराभूत करत सुवर्ण पदक पटकावलं. पार्थ साळुंखे हा साताऱ्याचा आहे. रँकिंग राऊंडमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या पार्थने सातव्या मानांकित सोंग इंजूनला पाच सेटपर्यंत कडवी झुंज देत 7 - 3 (26-26, 25-28, 28-26, 29-26, 28-26) असे पराभूत केलं.

साळुंखेने 10 पैकी 10 गुण मिळवणारे दोन तर 10 पैकी 9 गुण मिळवणारा एक निशाणा साधला. त्याने फायनलमध्ये 5 - 3 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर दोन एक्स (एकमद मधोमध निशाणा साधणे) निशाणे साधत दमदार शेवट केला.

पार्थ साळुंखे हा शिक्षकाचा मुला असून त्याच्या आर्चरीचे कौशल्य हे त्याचे प्रशिक्षक प्रवीण सावंत यांनी 2021 मध्ये ओळखले होते. त्यानंतर पार्थला सोनीपथ येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात राम अवदेश यांच्याकडून मार्गदर्शन मिळाले. तो आता युवा वर्ल्ड चॅम्पियन होणारा भारताचा पहिला आर्चर ठरला आहे.

भारताला 21 वर्षाखालील महिला रिकर्व वैयक्तिक प्रकारात देखील कांस्य पदक मिळाले आहेत. भारताच्या भाजा कौरने तैवानच्या सू सीन-यू चा 7-1 (28-25, 27-27, 29-25, 30-26) असा पराभव केला. भारताने आर्चरी युवा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सहा सुवर्ण पदके, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांची कमाई केली. भारत एकूण पदक संख्येत सर्वोच्च स्थान पटकावलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

पानिपताच्या लढाईनंतर या पेशव्याचं प्रेत विजयचिन्ह म्हणून अफगाणी सैनिक नेणार होते ! इतिहासातील अवघड प्रसंग

Photos : अंतराळातून दिसले पृथ्वीवर कोसळणाऱ्या प्रकाशस्तंभाचे अद्भुत दृश्य; शास्त्रज्ञही थक्क, पाहा आश्चर्यकारक फोटो..

Solapur News: 'मंगळवार, बुधवारी शाळा राहणार बंद'; वाढीव टप्पा अनुदानासाठी शिक्षक संघाचा निर्णय, नंतर मुंबईत आंदोलन

SCROLL FOR NEXT