yuvraj Team eSakal
क्रीडा

प्रसिद्ध क्रिकेटपटू युवराज सिंगला अटक; 'ती' चूक भोवली

हरियाणा पोलिसांनी केली कारवाई.

सुधीर काकडे

टीम इंडियाचा माजी खेळाडू युवराज सिंगला आज अटक करण्यात आली. हरियाणाच्या हांसीमधील हिसार पोलिसांनी ही कारवाई केली. लाईव्ह चॅटमध्ये केलेल्या एका चुकीमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. या बातमीनं क्रीडा विश्वात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.

युवराज सिंगने गेल्यावर्षी एका लाईव्ह चॅटमध्ये अनुसूचित जातीबद्दल अपशब्द वापरल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. स्थानिक वृत्त संस्था पंजाब केसरी मधून हे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, पोलिसांनी अटक करून त्याला सोडून दिलं आहे. युवराज सिंगने गेल्यावर्षी एका लाईव्ह चॅटमध्ये अनुसूचित जातीबद्दल अपशब्द वापरल्यानं त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. युवराज सिंगने या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवला असून, कोर्टाने युवराजला तपासामध्ये सहकार्य करण्याचे आदेश दिले होते.

युवराज सिंह यांनी अनुसूचित जातीविरुद्ध अपमानास्पद आणि आक्षेपार्ह शब्द वापरले होते. यामुळे दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी त्यांच्या विरोधात एससी एसटी कायदा आणि आयपीसीच्या विविध कलमांखाली हांसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. युवराज सिंगने हा खटला निकाली काढण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. ज्यावर उच्च न्यायालयाने युवराजला अटकपूर्व जामीन दिला. दरम्यान, युवराज सिंग हा याच प्रकरणात आज आपल्या सहकाऱ्यांसह हिसारमध्ये पोहोचला होता. युवराज सिंगने कोर्टात आपली ही चूक कबूल केली होती. आपल्याकडून नकळत ही चूक झाल्याचं युवराजने कोर्टात सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG, 1st ODI: भारताने उडवला अफगाणिस्तानचा धुव्वा; कर्णधार गिलची शानदार फिफ्टी, तर केएल राहुलची 'क्लास' फिनिश

Pune Fraud News : गुंतवणुकीच्या आमिषाने १२ कोटींची फसवणूक; पुण्यातील ४६ गुंतवणूकदारांची फसवणूक

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या पथकाची स्वारगेट बस स्टॉपवरील दुकानांवर धाड; ...तोपर्यंत दुकानं बंद ठेवण्याच्या सूचना

Gas Cylinder Shortage : खाद्यपदार्थांच्या दरात वाढ! दरवाढीमुळे हॉटेल व्यवसाय ‘गॅस’वर; बचतीसाठी शेगड्यांचा वापरही कमी

Modi-Trump Meeting: डोनाल्ड ट्रम्प-नरेंद्र मोदी यांची भेट ठरली; व्हाईट हाऊसची मंजुरी, 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

SCROLL FOR NEXT