yuvraj singh comment yuzvendra chahal photo lauki 
क्रीडा

तुझी साईज दुधीभोपळ्यासारखी! चहलची कुणी उडवली खिल्ली?

युजवेंद्र चहलने दुधीभोपळ्यासोबतचा फोटो शेअर केला आहे.

Kiran Mahanavar

आयपीएल संपल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सध्या ब्रेकवर आहेत. त्यानंतर 9 जूनपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे. दरम्यान, खेळाडू मजा करताना दिसत आहे. टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो, आणि काही ना काही फोटो अपडेट्स शेअर करत असतो. त्याने नुकताच त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यावर माजी क्रिकेटर युवराज सिंगनेही मजेशीर कमेंट केली आहे.(yuvraj singh comment yuzvendra chahal photo lauki)

चहलने त्याच्या इंस्टाग्रामवर दुधीभोपळ्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यावर माजी क्रिकेटपटू युवराजनेही मजेशीर कमेंट केली आहे. या पोस्टमध्ये चहलने हातात दुधीभोपळा धरला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, मी माझा #SelfieWithLauki सर्वात मोठा हिट स्टेडियमच्या बाहेर मारला आहे. तुम्ही सहमत आहात का?

लेगस्पिनर चहलच्या या पोस्टवर युवराजने कमेंट करत लिहिले, तुझ्या दुधीभोपळ्याचा आकारही तुझ्यासारखाच आहे. युवीची ही कमेंट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. युवराज व्यतिरिक्त चाहते चहलच्या या पोस्टवर मजेदार कमेंट करत आहेत आणि मीम्स देखील शेअर करत आहेत.

युजवेंद्र चहलने अलीकडेच संपलेल्या आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. चहल हा आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक 27 विकेट्ससह पर्पल कॅपचा विजेता होता. युझवेंद्र चहल लवकरच आफ्रिका मालिकेत दिसणार असून तो भारतीय फिरकी आक्रमणाचे नेतृत्व करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump wishes Modi : ट्रम्प यांनी केला मोदींना फोन दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अन् म्हणाले...

High Court Decision : उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय! अवैध विवाह संबंधातून जन्मलेल्या मुलाला वडिलांच्या मालमत्तेत वाटा मिळण्याचा हक्क

Athletics Championships: छत्रपती शिवाजी महाराज की जय! चीनमध्ये सर्वेश कुशारेची जागतिक मैदानी स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

SCROLL FOR NEXT