yuvraj singh reveals name of baby boy on fathers day
yuvraj singh reveals name of baby boy on fathers day 
क्रीडा

युवीने 'फादर्स डे'च्या दिवशी दाखवली मुलाची पहिली झलक अन् नाव ठेवले...

Kiran Mahanavar

भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आणि त्याची पत्नीने त्याच्या मुला सोबत पहिला फादर्स डे साजरा केला आहे. युवराज सिंगने आपल्या मुलासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्याने आणि हेजलने त्यांच्या मुलाचे नावाचा खुलासा केला आहे. (yuvraj singh reveals name of baby boy on fathers day)

क्रिकेटर युवराज सिंग आणि बॉलिवूड अभिनेत्री हेजल कीच यांचा विवाह ३० डिसेंबर २०१६ रोजी झाला होता. हेजलने फेब्रुवारीमध्ये मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मादरम्यान या जोडप्याने एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी युवराजने चाहत्यांना आपल्या मुलाचा चेहरा आणि नाव सांगितले नव्हते. मात्र युवराजने आपल्या मुलाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर करत नाव पण सांगितले आहे.

आज फादर्स डेच्या दिवशी युवराज सिंग आणि त्याच्या पत्नीने आपल्या मुलाचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या मुलाचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, जगात स्वागत आहे ओरियन कीच सिंग (𝗢𝗿𝗶𝗼𝗻 𝗞𝗲𝗲𝗰𝗵 𝗦𝗶𝗻𝗴𝗵). मम्मी आणि डॅडी त्यांच्या लहान 'मुलावर' खूप प्रेम करतात. तुझे डोळे प्रत्येक स्मिताने चमकतात, जसे तुझे नाव ताऱ्यांमध्ये लिहिलेले असते #Happy Fathers Day'

युवराज सिंगने आपल्या मुलाचा फोटो शेअर केल्यापासून त्याच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. प्रत्येकजण त्याच्या मुलाला पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होता आणि युवराज सिंगने त्याच्या चाहत्यांची ही उत्सुकता संपवली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: केजरीवालांची प्रतीक्षा लांबली! सुप्रीम कोर्टानं सुनावणी पुढे ढकलल्यानं कोठडीत वाढ

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटात राडा, हातकणंगलेत मतदान केंद्रावर कार्यकर्ते भिडले! नेमकं काय घडलं?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, तर सोलापुरातील दोन गावांचा मतदानावर बहिष्कार

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT