Yuzvendra Chahal Changed Profile Picture of X account 
क्रीडा

रोहितला MI ने हटवल्यानंतर खेळाडूंमध्ये नाराजी? बुमराह अन् सूर्या नंतर 'या' खेळाडूचा डीपी चर्चेत

पण चहलनं त्याचा डीपी का बदलला? रोहित शर्मासोबत काय आहे कनेक्शन

Kiran Mahanavar

Yuzvendra Chahal : काही दिवसाआधी आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्स संघाने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवले. फ्रँचायझीच्या या निर्णयानंतर अनेक चाहते प्रचंड संतापले. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक सतत मुंबईवर आपला राग काढत आहेत. इतकेच नाही तर काही चाहत्यांने मुंबई इंडियन्सची जर्सी जाळल्या.

त्यानंतर सूर्यकुमार यादवच्या एका पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक हृदय तुटलेले इमोजी शेअर केला होता. सूर्यकुमार यादव आधी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही रोहित शर्माच्या कर्णधारपद सोडल्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. आता अनुभवी लेगस्पिनर युजवेंद्र चहलने त्याच्या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटचा प्रोफाइल फोटो बदलला आहे. त्यामुळे तो चर्चत आला आहे.

33 वर्षीय अनुभवी फिरकीपटूने ट्विटरवर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सोबतचा नवीन प्रोफाइल पिक्चर पोस्ट केला आहे. या फोटोत दोन्ही खेळाडू भारतीय जर्सीमध्ये आहेत आणि ‘हिटमॅन’ शर्मा चहलला मिठी मारताना दिसत आहेत. इतकंच नाही तर युजवेंद्र चहलच्या कव्हर फोटोमध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही त्याच्यासोबत दिसत आहे.

युझवेंद्र चहल सध्या भारतीय संघासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारतीय संघाला येथे यजमान संघासोबत टी-20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळायची आहे. तीन सामन्यांची टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली आहे.

सध्या तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना 17 डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे खेळला गेला. मात्र, चहलला मैदानात उतरण्याची संधी मिळाली नाही. चहल हा आफ्रिकन दौऱ्यावर असलेल्या वनडे संघाचा भाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Acid Attack : राजधानी दिल्लीत संतापजनक घटना! महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर भररस्त्यात ‘अ‍ॅसिड’ हल्ला

Uttar Pradesh News : सीएम योगींची दिल्लीत पीएम मोदींशी भेट, सुमारे एक तास चर्चा; मंत्रिमंडळ विस्तारावर मंथन?

New CJI Appointment 2025 : कोण होणार देशाचे नवे सरन्यायाधीश? बीआर गवई यांनी केली नावाची घोषणा...

INDW vs BANW: राधा यादवसह भारतीय गोलंदाजांचा बांगलादेशविरुद्ध तिखट मारा, वर्ल्ड कप सेमीफायनलपूर्वी सोप्या विजयाची संधी

Noida International Airport : नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख लवकरच ठरणार! मोदी करणार उद्घाटन?

SCROLL FOR NEXT