Yuzvendra Chahal & dhanashree verma relationship 
क्रीडा

Yuzvendra Chahal Wife : धनश्री वर्माने युझवेंद्र चहलसोबतच्या नात्यावर तोडले मौन; 'मी शस्त्रक्रिया...'

चहलची पोस्ट आणि धनश्रीचे आडनाव काढून टाकल्यानंतर या जोडप्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे असा अंदाज लावला जात होता. पण

Kiran Mahanavar

Yuzvendra Chahal & Dhanashree Verma Relationship : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा आता खूप ट्रेंड करत आहे. धनश्रीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून चहल हे आडनाव काढून टाकले. त्याचवेळी युजवेंद्र चहलनेही त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये 'न्यू लाइफ लोडिंग' असे लिहिले होते. चहलची पोस्ट आणि धनश्रीचे आडनाव काढून टाकल्यानंतर या जोडप्यामध्ये काहीतरी बिनसलं आहे असा अंदाज लावला जात होता. पण चहल आणि धनश्रीने इंस्टाग्राम पोस्टद्वारे सांगितले आहे की आमच्या दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे.

या धनश्री वर्माने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. पोस्टाच्या माध्यमातून त्यांनी परिस्थिती निवळण्याचा प्रयत्न केला आहे. धनश्री वर्माने या पोस्टमध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे डान्स करू शकत नसल्याचे लिहिले आहे. धनश्री वर्माच्या म्हणण्यानुसार, डॉक्टरांनी सांगितले की, तिला पुन्हा डान्स करायचा असेल तर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. ती पुढे लिहिते की, परिस्थिती अनुकूल नव्हती, खूप आव्हानात्मक परिस्थिती होती, पण पती युजवेंद्र चहलचा पूर्ण पाठिंबा मिळाला.

धनश्री वर्माने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये पुढे लिहिले की, कठीण परिस्थितीत मला माझे पती, कुटुंब आणि जवळच्या मित्रांची साथ मिळाली. अशा परिस्थितीत मला सर्वांच्या पाठिंब्याची गरज होती, कारण डॉक्टरांनी सांगितले होते की, जर मला आयुष्यात पुन्हा डान्स करायचे असेल तर मला शस्त्रक्रिया करावी लागेल, शस्त्रक्रियेशिवाय दुसरा पर्याय नाही. धनश्री वर्मा पुढे सांगते की, परिस्थिती कठीण होती, पण मधल्या काळात लोकांनी अफवा पसरवायला सुरुवात केली, पण हे सर्व ऐकणे माझ्यासाठी सोपे नव्हते, मला खूप वाईट वाटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT