Yuzvendra Chahal kisses Suryakumar Yadav hands esakal
क्रीडा

.....अन् चहलने घेतला सुर्यकुमार यादवचा Kisssss, व्हिडीओ व्हायरल

भारतीय संघाच्या विजयाचा हिरो शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव ठरला.

सकाळ डिजिटल टीम

भारताने तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रीलंकेचा ९१ धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारताने ३ टी-20 सामन्यांची मालिका २-१ अशी खिशात घातली. विशेष म्हणजे या विजयात धडाकेबाज फलंदाज सुर्यकुमार यादवची मोलाची कामगिरी ठरली. सुर्याने शतक केले. या शतकी खेळीनंतर त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. दरम्यान, फिरकी गोलंदाच युज्वेंद्र चहल आणि सुर्यकुमारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सुर्यकुमार यादव हर्षा भोगलेसोबत चर्चा करताना दिसत आहे. दरम्यान, चहल येतो आणि थेट सुर्यकुमारच्या जवळ येत त्याच्या हाताला चुंबन करतो. चहलने केलेलं हे कृत्य पाहून नेटकरी जाम खुश झालेत. चहलचा हा व्हिडीओ व्हायरल होत असून त्याच्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

PCB घेणार मोठा निर्णय; अफ्रिदी होणार निवड समितीचा अध्यक्ष

भारतीय संघाच्या विजयाचा हिरो शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव ठरला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरलेल्या सूर्यकुमारने ५१ चेंडूत ११२ धावा करत श्रीलंकेच्या गोलंदाजांची जबरदस्त धुलाई केली. सूर्याने ९ षटकार आणि ७ चौकार लगावले. सूर्यकुमार यादवचे टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे तिसरे शतक होते.

सूर्याचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक गेल्या वर्षी जुलैमध्ये नॉटिंगहॅमच्या मैदानावर झळकले होते. त्यावेळी त्याने इंग्लंडविरुद्ध ११७ धावांची खेळी खेळली. त्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये, सूर्यकुमार यादवने न्यूझीलंडविरुद्ध माऊंट मौनगानुई येथे नाबाद १११ धावांची खेळी केली. म्हणजेच सूर्यकुमारने आधी इंग्लंडमध्ये, नंतर न्यूझीलंडमध्ये आणि आता आपल्या घरच्या मैदानावर टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात शतक झळकावले आहे. सूर्यकुमार यादव सध्या ICC T20 क्रमवारीत नंबर १ फलंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

SCROLL FOR NEXT