Yuzvendra Chahal Post Romantic Video With Wife Dhanashree Verma ESAKAL
क्रीडा

Yuzvendra Chahal : मस्त चाललंय आमचं! चहलने रोमँटिक VIDEO शेअर करत ...

अनिरुद्ध संकपाळ

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Romantic Video : भारताचा अव्वल लेग स्पिनर युझवेंद्र चहलची नुकतीच ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. युझवेंद्र चहलने आयपीएल 2022 नंतर भारतीय संघात जोरदार पुनरागमन करत वर्ल्डकप संघात स्थान मिळवले. मध्यंतरी त्याच्या वैवाहिक जीवनात वादळ उठल्याची अफवा पसरली होती. धनश्री वर्माने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चहल आडनाव हटवल्यानंतर या अफवांना उत आला होता. यावर चहल आणि धनश्री दोघांनीही सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. आता या स्पष्टीकरणाला बळकटी आणणारा व्हिडिओ युझवेंद्र चहलने आपल्या इन्स्टाग्रावर अकाऊंटवरून शेअर केला आहे.

युझवेंद्र चहलने हा व्हिडिओ पत्नी धनश्री वर्माला देखील टॅग केला आहे. या रोमँटिक व्हिडिओत युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांच्यामधील काही प्रेमळ क्षण दाखवण्यात आले आहेत. विशेषकरून हे दोघे व्हेकेशनवर असतानाचे हे रोमँटिक क्षण आहेत. या व्हिडिओला 'देखा एक ख्वाब तो..' हे सदाबहार गाण्याची जोड देखील देण्यात आली आहे. युझवेंद्र चहलने या व्हिडिओला 'माझी स्ट्राँग पत्नी ही माझी ताकद आहे' असे कॅप्शन देखील दिले आहे.

युझवेंद्र चहलने शेअर केलेल्या या व्हिडिओनंतर आता या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या अफवांवर पडदा पडला आहे. युझवेंदर आणि धनश्रीने 2020 मध्ये लग्न केले होते. धनश्री ही डॉक्टर आहे मात्र तिने वैद्यकीय क्षेत्र सोडून कोरियोग्राफीमध्ये हात आजमावला. इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर तिचा मोठा फॅन फॉलोईंग बेस आहे. धनश्री युझवेंद्रबरोबर अनेक रील्स तयार करते. त्याला उत्तम प्रतिसाद देखील मिळत असतो. याचबरोबर ती भारतीय संघातील खेळाडूंसोबत डान्स करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : तेजस्वी यादवसह चौघांविरोधात 'FIR' दाखल; जाणून घ्या, नेमकं काय प्रकरण?

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

SCROLL FOR NEXT