Dhanashree and Yuzvendra Chahal
Dhanashree and Yuzvendra Chahal instagram
क्रीडा

गुगली टाकायला बायकोनं शिकवलं! राशिदनं घेतली युजीची फिरकी

सुशांत जाधव

भारतीय संघाचा फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय आहे. तो आपल्या सोशल अकाउंटवरुन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. यावेळी चहलने इंस्टाग्राम अकाउंटच्या पोस्टवरुन एक व्हिडिओ शेअर केलाय. यात तो पत्नी धनश्री वर्मासोबत (Dhanashree Varma) दिसतोय. प्रत्येक फिरकीपटूने लवकर लग्न करायला पाहिजे, असा असे तो धनश्रीला सांगताना दिसते. प्रत्येक स्पिनरनेच का? असा प्रतिप्रश्न धनश्री त्याला करते. यावर चहल म्हणतो की गुगली टाकणे मी पत्नीकडूनच शिकलोय. (yuzvendra chahal said my wife taught me to googly rashid khan funny comment)

चहलच्या या व्हिडिओवर अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने प्रतिक्रिया दिलीये. त्याने यावर मजेदार कमेंट केल आहे. राशिद खानने म्हटलंय की, लग्नाशिवाय देखील मला गूगली कशी टाकायची ते माहिती आहे. राशिदच्या प्रतिक्रियामुळे युजी-धनश्रीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आलाय. हार्दिक पांड्याने या सर्व चर्चेत स्माईलीची इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिल्याचे पाहायला मिळते.

चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय आहेत. दोघेही सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतात. धनश्री स्वत: आपल्या हटके डान्स व्हिडिओमुळे चर्चेत असते. ती लोकप्रिय युट्युबर असून तिचा फॅन फॉलोवर्सही मोठ्या प्रमाणात आहे.

राशिद खानने यावर प्रतिक्रिया देण्यामागेही खास कारण आहे. अफगाणिस्तानच्या स्टार गोलंदाज लग्न बंधनात कधी अडकणार? असा प्रश्न त्याला नेहमी विचारण्यात येतो. एका मुलाखतीमध्ये त्याने अफगाणिस्तान ज्यावेळीला वर्ल्ड कप जिंकेल त्यावेळीच लग्न करेल, असे म्हटले होते. अफगाणिस्तान वर्ल्ड कप कधी जिंकणार आणि राशिदच लग्न कधी होणार? हा प्रश्न एक स्वतंत्र चर्चेचाच विषय आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT