Yuzvendra Chahal 
क्रीडा

Yuzvendra Chahal : वर्ल्ड कप 2023 च्या संघातून डच्चू दिल्यानंतर चहलने घेतला मोठा निर्णय! आता 'या' संघाकडून खेळणार

Kiran Mahanavar

Yuzvendra Chahal to play in County Championship : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आशिया कप 2023 दरम्यान वर्ल्ड कपसाठी भारतीय संघांची घोषणा केली आहे. 5 सप्टेंबर रोजी कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या 15 खेळाडूंचा खुलासा केला. हा संघ जवळपास आशिया कप संघासारखाच होता.

या संघात केवळ युवा तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा समावेश केला नाही. टीम इंडियाचा अनुभवी लेगस्पिनर युजवेंद्र चहलला पुन्हा एकदा संघातून वगळण्यात आले. चहलच्या जागी त्याचा मित्र कुलदीप यादवला पसंती देण्यात आली. मात्र, आता वर्ल्ड कप संघात निवड न झाल्याने चहल प्रथमच कौंटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, लेग-स्पिनर युझवेंद्र चहल कौंटी क्रिकेटमध्ये केंटकडून खेळणार आहे. चहल प्रथमच काऊंटी क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे.

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, 'केंट काउंटी क्रिकेट क्लब याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करेल. चहल त्यांच्यासाठी तीन ते चार वनडे खेळणार आहे. बीसीसीआयने त्याला काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी एनओसी दिली आहे. भारतीय संघाला त्याची गरज भासल्यास चहल लगेच संघात सामील होईल.

चहलने 2023 मध्ये फक्त 2 एकदिवसीय सामने खेळले असून 3 विकेट्स घेतल्या आहेत. 33 वर्षीय खेळाडूने 72 एकदिवसीय सामन्यांमध्ये 121 विकेट्स आणि 80 टी-20 मध्ये 96 विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT