Dhanashree Verma Instagram Story 
क्रीडा

धनश्री-श्रेयस अय्यरची स्टोरी अन् चर्चांना उधाण! काय आहे व्हायरल फोटो मागचे रहस्य?

Kiran Mahanavar

Dhanashree Verma Instagram Story : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नुकतीच धनश्रीची एक इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि याचे कारण आहे भारतीय खेळाडू श्रेयस अय्यर. दोघांच्या स्टोरी एक संबंध शोधून चाहत्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. संपूर्ण प्रकरण काय आहे आणि त्याचे सत्य काय आहे.

धनश्री आणि श्रेयस अय्यरची स्टोरी व्हायरल

धनश्रीने बुधवारी बाल्कनीतील एक फोटो शेअर केले. या फोटोत समोर एक इमारत दिसत होती आणि पाऊस पडत आहे. श्रेयस अय्यरने शेअर केलेल्या स्टोरीमध्येही असेच होते. मग काय चाहते वेगवेगळे अंदाज बांधू लागले. काहींनी दोघे एकाच हॉटेलच्या खोलीत असल्याचे सांगितले तर काहींनी ते एकमेकांची कॉपी करत असल्याचे सांगितले. धनश्री युजवेंद्र चहलची फसवणूक करत असल्याचेही काही युजर्सने म्हटले होते.

काय आहे व्हायरल फोटो मागचे रहस्य?

आता हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते तुम्हाला सांगतो. धनश्री आणि श्रेयसची स्टोरी सारखी दिसत असली तरी दोघांमध्ये खूप फरक आहे. हे फोटो वेगवेगळ्या बाल्कनीचे आहे ज्याचा पुरावा त्या चित्रात असलेल्या बाल्कनीच्या ग्रिलवरून दिसून येतो जो दोन्ही फोटोमध्ये भिन्न आकाराचा आहे.

आता हे दोघे एकाच ठिकाणी असण्याचे कारण समजावून घेऊ. श्रेयस अय्यर गेल्या काही दिवसांपासून बेंगळुरू येथील एनसीएमध्ये प्रशिक्षण घेत आहे. युझवेंद्र चहलही एनसीएमध्ये असून हे सर्व खेळाडू एकाच ठिकाणी राहत आहेत. धनश्रीही चहलसोबत बेंगळुरूमध्ये आहे.

याआधीही धनश्रीचे नाव श्रेयस अय्यरशी जोडले गेले होते. धनश्रीने तिच्या नावातून चहल काढून टाकले होते, तेव्हाही ती श्रेयस अय्यरला डेट करत असल्याचे सांगण्यात आले होते. दोघांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Electricity Bill Saving Tips : सरकारने स्वतःच सांगितली लाईट बिल कमी करण्याची पद्धत; मीटर पळेल एकदम हळू, पाहा सोपी ट्रिक

Asha Bhosle’s Final Song : “या प्रवासाच्या शेवटी मी एक स्वर बनेन…” आशा ताईंंच शेवटचं गाणं चर्चेत, Viral Video

Jallianwala Bagh Massacre : रक्तरंजित इतिहासाला १०७ वर्षे पूर्ण; १६०० हून अधिक निष्पापांचा बळी घेणाऱ्या नरसंहाराची कहाणी

Pandharpur : तरुणीने स्वत:च अ‍ॅसिड ओतून घेतलं, हल्ल्याचा रचला बनाव; कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT