Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma sakal
क्रीडा

Yuzvendra Chahal : चहलची बायको देणार घटस्फोट? इंस्टावरुन नाव केलं डिलीट अन्...

युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यानंतर त्याच्या घटस्फोट संबंधित चर्चाना सुरू झाल्या आहेत.

Kiran Mahanavar

Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या क्रिकेटमधून ब्रेकवर असून आता तो थेट आशिया कपमध्ये खेळणार आहे. मात्र युझवेंद्र चहल हा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे आता जास्त चर्चेत आला आहे. युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यानंतर त्याच्या घटस्फोट संबंधित चर्चाना सुरू झाल्या आहेत. युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माने काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर तिचे नाव बदलले होते. आधी ती धनश्री वर्मा चहल लावत होती, पण आता ती फक्त धनश्री वर्मा लिहीत आहे. या बदलानंतर युजवेंद्र चहलने त्याच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली, ज्यामध्ये 'न्यू लाइफ लोडिंग' असे लिहिले आहे.

सोशल मीडियावर अशी खळबळ माजल्यानंतर अनेक अंदाज बांधले जाऊ लागले आहेत, ट्विटरवरही अनेक चाहत्यांनी दोघांच्या नात्याबद्दल बोलले आहे. मात्र या दोघांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. अशा परिस्थितीत जे काही चालले आहे, ते सर्व एक अटकळ आहे. लॉकडाऊन दरम्यान युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांनी लग्नाचे फोटो शेअर केले होते. दोघांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याची माहिती दिली होती. धनश्री वर्मा एक कोरिओग्राफर आहे, तिचे डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात.

टीम इंडियाचे सर्व स्टार आणि सीनियर खेळाडू यावेळी ब्रेकवर आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ झिम्बाब्वेमध्ये एकदिवसीय मालिका खेळत आहे, तर टीम इंडियाला त्यानंतर आशिया कप खेळायचा आहे. त्यानंतरच युजवेंद्र चहलही टीम इंडियासोबत परतणार आहे. युझवेंद्र चहलने टीम इंडियासाठी 67 वनडेमध्ये 118 विकेट घेतल्या आहेत, तर 62 वनडेमध्ये 79 विकेट घेतल्या आहेत. युझवेंद्र चहलने आतापर्यंत आयपीएलमध्ये 131 सामन्यांमध्ये 166 विकेट घेतल्या आहेत, तो सध्या राजस्थान रॉयल्सशी संबंधित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: नीरज चोप्राचे 'सुवर्ण' हुकले, Rumesh Pathirage ने मारली बाजी; पाकड्या अर्शद नदीमची लाज गेली, वाचा काय झालं...

TEJASWIN SHANKAR HISTORICAL MEDAL: तेजस्विन शंकरने इतिहास घडवला! खडतर अशा डेकॅथलॉन स्पर्धेत भारताला जिंकून दिले पहिले पदक

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

SCROLL FOR NEXT