west indies-in world-cup-qualifiers-icc-fined-60-percent match-fees  
क्रीडा

ODI WC Qualifiers : वर्ल्ड कप पात्रता फेरीत वेस्ट इंडिज सापडली मोठ्या संकटात! आयसीसीने ठोठावला दंड

Kiran Mahanavar

ODI WC Qualifiers : या वर्षाच्या अखेरीस भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी झिम्बाब्वेमध्ये पात्रता सामने खेळले जात आहेत. या स्पर्धेचा सामना झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाला. जिथे झिम्बाब्वेने वेस्ट इंडिजचा 35 धावांनी पराभव केला.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर दोन वेळचा विश्वविजेता संघ आणखीनच अडचणीत सापडला आहे. वेस्ट इंडिजचा संघ आतापर्यंत जागतिक पात्रता फेरीत चमकदार कामगिरी करत होता. पण पराभवामुळे त्याच्या संघाची गणित बिघडू शकते. आता आयसीसीनेही त्याच्या संघावर मोठा दंड ठोठावला आहे.

आयसीसीने दंड ठोठावला

झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव झाल्यानंतर त्यांचा संघ आधीच टेन्शनमध्ये होता. आता त्यांचा टेन्शन दुप्पट करत आयसीसीने त्यांच्यावर मोठा दंड ठोठावला आहे. खरे तर या सामन्यात वेस्ट इंडिज संघाने स्लो ओव्हर स्पीडचे नियम मोडले आहेत. त्यामुळे वेस्ट इंडिजला दंड ठोठावण्यात आला आहे. आता त्याच्या मॅच फीच्या 60% गमवाव्या लागल्या आहेत कारण आयसीसीने त्याची मॅच फी दंड म्हणून कापली आहे.

झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने 49.5 षटकांत 10 गडी गमावून 268 धावा केल्या. वेस्ट इंडिजसमोर 269 धावांचे लक्ष्य फार मोठे नव्हते. मात्र दुसऱ्या डावात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत वेस्ट इंडिज संघाला लक्ष्य गाठू दिले नाही. वेस्ट इंडिजचा डाव 44.4 षटकात 233 धावांवर आटोपला आणि झिम्बाब्वेने मोठा अपसेट करत सामना जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT