Zimbabwe Cricket News Marathi sakal
क्रीडा

Zimbabwe Cricket News : क्रिकेटविश्वात उडाली खळबळ! अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोन खेळाडूंवर बंदी

Kiran Mahanavar

Zimbabwe Cricket News : गेल्या महिन्यात झिम्बाब्वेचे खेळाडू वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांच्यावर अंमली पदार्थ सेवन केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली आणि यामध्ये स्पष्ट झाले की त्यांनी अंमली पदार्थ सेवन केले आहे. आता झिम्बाब्वे क्रिकेट संघाने मोठी कारवाई केली आहे.

वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. दोन्ही क्रिकेटपटू 4 महिने क्रिकेट खेळू शकणार नाहीत. त्याचवेळी वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांनी तपास समितीसमोर प्रतिबंधित अंमली पदार्थचा वापर केल्याची कबुली दिली. या दोन्ही क्रिकेटपटूंची गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात डोप चाचणी झाली होती.

याशिवाय वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांना त्यांच्या पगाराच्या 50 टक्के दंड भरावा लागणार आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, झिम्बाब्वे क्रिकेट ड्रग्ज आणि बंदी असलेल्या ड्रग्जवर शून्य सहनशीलतेच्या धोरणावर काम करते. आमच्या समितीला असे आढळून आले की वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांनी अंमली पदार्थ सेवन केले आहेत. त्यामुळे हा गंभीर गुन्हा असून, दोन्ही क्रिकेटपटूंनी नियम मोडले आहेत. वेस्ली माधवेरे आणि ब्रँडन मावुता यांच्यामुळे आमचे नाव खराब झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cab Rules: कॅब ॲग्रीगेटर धोरणात मोठा बदल! कॅब राईड रद्द करणे चालकांना महागात पडणार; सरकार आता 'इतका' दंड वसूल करणार

CJP Jantar Mantar: 'सीजेपी'शी चर्चा करण्यासाठी मंत्री 'जंतरमंतर'वर जाणार?, अट मान्य करत मोदी सरकारची चर्चेची तयारी

Latest Marathi Update : तवी नदीने धोक्याची पातळी ओलांडली

दिल्लीतील CJP व विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज-उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा

Chilgoza Halwa Recipe: १ किलो हलव्यासाठी ६,००० रुपये! लखनौचा चिलगोजा का आहे इतका महाग?

SCROLL FOR NEXT