Zimbabwe Vs Bangladesh T20 World Cup 2022  esakal
क्रीडा

ZIM vs BAN : भारत - पाक थरार विसरा! झिम्बाब्वे बांगलादेश सामन्यातही 'नो बॉल' ठरला दुखरी नस

अनिरुद्ध संकपाळ

Zimbabwe Vs Bangladesh T20 World Cup 2022 : टी 20 वर्ल्डकप 2022 मधील ग्रुप 2 मधील बांगलादेश विरूद्ध झिम्बाब्वेच्या सामन्यात झुंजार झिम्बाब्वेने पुन्हा एकदा आपला दम दाखवून दिला. या सामन्यात देखील नो बॉल नाट्य पहावयास मिळाले. मात्र बांगलादेशने शेवटच्या चेंडूवर सामना 3 धावांनी जिंकला. बांगलादेशचे 151 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या झिम्बाब्वेने खराब सुरूवातीनंतरही शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली.

झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशला 150 धावात रोखले. झिम्बाब्वेने त्यानंतर 5 बाद 69 धावा अशा खराब सुरूवातीनंतर डाव सावरत शेवटच्या 3 षटकात तुफान फटकेबाजी केली. यामुळे बांगलादेशच्या ह्रदयाचे ठोके वाढले होते. मात्र कर्णधार शाकिब - अल - हसनने झिम्बाब्वेच्या सेन विलियम्सची 42 चेंडूत केलेली 64 धावांची झुंजार खेळी संपवली. बांगलादेश सामना जिंकणार आणि हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरणार असे वाटत होते. मात्र शेवटच्या षटकात वेगळाच थरार पहायला मिळाला.

झिम्बाब्वेला शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज असताना झिम्बाब्वेच्या नागारवाने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर एक षटकार एक चौकार मारले. सामना दोन चेंडूत 5 धावा असा आला असताना शेवटचे षटक टाकणाऱ्या मोसादेक हुसैनने शेवटच्या दोन चेंडूवर दोन विकेट घेतल्या. बांगलादेशला हुसैनने सामना जिंकून दिला असे चित्र निर्माण झाले असताना शेवटच्या चेंडूवर मात्र विकेटकिपरने स्टम्पिंग करताना चेंडू स्टम्पच्या पुढे पकडल्याने अंपायर रिव्ह्यूमध्ये हा नो बॉल देण्यात आला. दरम्यान, दोन्ही संघ पॅव्हेलियनमध्ये पोहचले होते. त्यामुळे झिम्बाब्वेला शेवटच्या चेंडूवर (फ्री हिट) विजयासाठी 4 धावांची गरज होती. बांगलादेशला फक्त या चेंडूवर चौकार द्यायचा नव्हता. स्ट्राईकवर असलेला मुझारबानीने मिळालेली संधी दवडली. तो मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडू हुकला आणि बांगलादेशने 3 धावांनी सामना जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli District Bank Election : सांगली जिल्हा बँक निवडणुकीत दिग्गजांना धक्का; संजयकाका पाटलांचा विजय; सुमनताई पाटील यांचा एका मताने पराभव

Sangli District Bank Election Result : सांगलीच्या राजकारणात मोठा उलटफेर! जतमध्ये विरोधकांचा 'करेक्ट कार्यक्रम'; अटीतटीच्या लढतीत 54 मते घेत गोपीचंद पडळकरांनी मारली बाजी

IND vs NZ 1st ODI: ऋतुराज गायकवाड OUT! शुभमन गिलने Playing XIचे दिले संकेत; अक्षर पटेल- लोकेश राहुल यांच्याबाबत होणार टॉस, नेमकी असा असेल संघ?

Mumbai News: ...ही न्यायाची थट्टा! भूखंडाचा ताबा देण्याचे म्हाडाला निर्देश, याचिकाकर्त्याला दिलासा

‘जोगवा’मधील एका क्लोज शॉटने बदललं उपेंद्र लिमयेंचं नशीब! राजीव पाटील यांची भविष्यवाणी ठरली खरी

SCROLL FOR NEXT