Heath Streak Passed Away  
क्रीडा

Heath Streak Passed Away : दिग्गज क्रिकेटपटूने घेतला अखेरचा श्वास! पत्नीची भावनिक पोस्ट व्हायरल, काही दिवसांपूर्वी पसरली होती मृत्यूची अफवा

Kiran Mahanavar

Heath Streak Passed Away : झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे 3 सप्टेंबरच्या पहाटे निधन झाले आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याच्या पत्नीने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली आणि काही फोटो पोस्ट केले आहेत.

हीथ स्ट्रीकची पत्नी नादिनने पतीच्या निधनानंतर एक भावनिक पोस्ट लिहिली आणि म्हणाली की, आज पहाटे रविवार 3 सप्टेंबर 2023, माझ्या आयुष्यातील प्रेम आणि माझ्या सुंदर मुलांचे वडील आम्हा सर्वांना सोडून गेले.

तिने पुढे लिहिले की, त्याला आपले शेवटचे दिवस आमच्यासोबत घालवायचे होते. कुटुंबाकडून प्रेम हवे होते. अनंतकाळच्या प्रवासासाठी आपण पुन्हा कधीतरी भेटू. हेन्री ओलांगाच्या एका ट्विटमुळे अलीकडे हीथ स्ट्रीकच्या मृत्यूची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. यानंतर स्ट्रीकने या अफवांचे खंडन केले आणि सांगितले की तो जिवंत आहे. अफवा पसरवणाऱ्यांनी त्याला दुखावले आहे.

हीथने नोव्हेंबर 1993 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. 65 कसोटी आणि 189 एकदिवसीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वेचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या नावावर कसोटीत 1990 आणि एकदिवसीय सामन्यात 2943 धावा आहेत. याशिवाय हीथने कसोटीत 216 आणि एकदिवसीय सामन्यात 239 विकेट्स घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

India A vs Australia A, ODI: भारतीय संघाने व्हाईटवॉश टाळला! ऑस्ट्रेलियाला शेवटच्या सामन्यात पराभवाची धूळ चारली

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Beed Highway Accident : अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर पिकअप आणि टिप्परची भीषण धडक; २ जण ठार, ३ गंभीर तर ५ गुरांचाही मृत्यू

SCROLL FOR NEXT