Weekend Travel google
लाइफस्टाइल

Weekend Travel : फक्त एकच दिवस सुट्टी घ्या आणि ४ दिवस फिरा; कसं कराल नियोजन ?

परवा प्रजासत्ताक दिन आहे. त्यासाठी पर्यटनाचं नियोजन कसं करायचं ते पाहू.

नमिता धुरी

मुंबई : सुट्टी मिळाली की जोडीदारासोबत किंवा कुटुंबासोबत फिरायला जाण्याची स्वप्नं प्रत्येकजण बघू लागतो. पण अशा वेळी जवळपासच्या ठिकाणीच जाण्याचं नियोजन करावं लागतं.

लांबच्या ठिकाणी जायचं म्हणजे ४-५ दिवसांचा वेळ तरी पाहिजेच. पण एवढे दिवस ऑफिसमधून सुट्टी मिळणं कठीण असतं. त्यामुळे शक्य होत नाही.

परवा प्रजासत्ताक दिन आहे. त्यासाठी पर्यटनाचं नियोजन कसं करायचं ते पाहू. हेही वाचा - ..या शहरात सापडतात शेकडो रोनाल्डो आणि मेस्सी

२६ जानेवारीची सुट्टी बहुतांश कार्यालयांमध्ये अधिकृतरित्या दिली जाते. त्यामुळे हा एक दिवस तुम्हाला फिरण्यासाठी मिळत आहे. आता तुम्हाला फक्त शुक्रवारी म्हणजे २७ जानेवारीला सुट्टी घ्यायची आहे.

बहुतांश कार्यालयांना शनिवार आणि रविवारी सुट्टी असते. त्यामुळे हे दोन दिवसही तुम्हाला फिरण्यासाठी मिळतील. म्हणजे एकूण ४ दिवसांची सुट्टी मिळेले.

फिरायला जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी तुम्ही बुधवारी म्हणजेच २५ जानेवारीला रात्री निघू शकता.

प्रवासाचं नियोजन कसं असावं ?

२५ जानेवारी - बुधवार, रात्री निघा.

२६ जानेवारी - गुरुवार (प्रजासत्ताक दिन) ही सरकारी सुट्टी आहे.

२७ जानेवारी - शुक्रवार (तुम्हाला या दिवशी सुट्टी घ्यावी लागेल.)

२८ जानेवारी - शनिवार, वीकेण्डची सुट्टी.

२९ जानेवारी - रविवार, वीकेण्डची सुट्टी.

या ४ दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही कुटुंब, मित्र किंवा जोडीदारासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही उत्तर भारतातील अनेक उत्तम ठिकाणांना भेट देऊ शकता.

जर तुम्ही डोंगराळ ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही लॅन्सडाउन, डेहराडून, मसुरी, परवानू, हरिद्वार आणि ऋषिकेश यांसारख्या ठिकाणी जाऊ शकता.

जर तुम्ही २६ जानेवारीच्या वीकेण्डला वाळवंटी भागात जाण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जयपूर, उदयपूर, जैसलमेर, बिकानेर इत्यादी अनेक शहरांना भेट देण्यासाठी जाऊ शकता. या शहरांमध्ये २६ जानेवारीचा दिवस उत्साहात साजरा केला जातो.

याशिवाय, जर तुम्ही दक्षिण-भारतातील काही उत्तम ठिकाणांना भेट देण्याचा विचार करत असाल तर तुम्ही विमानाने जाऊ शकता. दक्षिण-भारतात तुम्ही केरळ, मुन्नार, अलेप्पी, कुर्ग, हम्पी किंवा उडुपी सारख्या ठिकाणी भेट देऊ शकता. विमानाने प्रवास केल्याने तुमचा वेळ वाचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राला मिळणार १२ नवे IPS अधिकारी; पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश, ३१ ऑगस्टपासून सांभाळणार जबाबदारी, वाचा यादी

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

"मी फक्त 50 रुपयांत केस कापतो"; कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचं विधान; संपत्तीबाबत भाजपचा खुलासा

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

SCROLL FOR NEXT