Coconut Water For Hairs esakal
लाइफस्टाइल

Coconut Water For Hairs : केसांच्या वाढीसाठी फायदेशीर आहे नारळाचे पाणी, अशा पद्धतीने करा वापर

नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Coconut Water For Hairs : नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते. नारळाचे पाणी प्यायल्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. त्यामुळे, अनेक जण त्यांच्या आहारात नारळ पाण्याचा आवर्जून समावेश करतात.

नारळाचे पाणी प्यायल्यावर आपल्याला फ्रेश वाटते आणि शरीरात ऊर्जा येते. नारळचे पाणी प्यायल्यामुळे पचनाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. नारळाच्या पाण्याचे आपल्या आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठी देखील भरपूर फायदे आहे.

केसांच्या समस्या दूर करण्यासाठी नारळाच्या पाण्याचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, तो वापर कसा करायचा? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

नारळाच्या पाण्याने धुवा केस

नारळाच्या पाण्याचा केसांवर वापर केल्याने केसांना पोषण तर मिळतेच शिवाय, केस हायड्रेटेड राहण्यास मदत होते. केसांच्या वाढीसाठी नारळाच्या पाण्याने केस धुणे हा अतिशय सोपा आणि फायदेशीर उपाय आहे.

नारळाच्या पाण्याने केस धुण्यापूर्वी सुरूवातीला केस कोणत्याही शॅंम्पूने धुवा. त्यानंतर, एका ऑरगॅनिक शॅंम्पूच्या मदतीने केस धुवा. त्यानंतर, केसांवर नारळ पाण्याचा वापर करा. नारळ पाण्याने केस धुतल्यानंतर आता केस चांगल्या प्रकारे सूकवा.

नारळपाणी हेअर मास्क

नारळपाणी हेअर मास्क हे तुम्हाला वाचायला जरी वेगळे वाटत असले तरी सुद्धा तुम्ही हा हेअर मास्क बनवू शकता. या हेअर मास्कचा वापर केल्यावर केस गळतीची समस्या दूर होण्यास मदत होईल.

नारळ पाण्याचा हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये स्मॅश केलेली केळी घ्या. आता या केळ्यामध्ये १ चमचा दही आणि ३-४ चमचे नारळपाणी प्या. आता हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून ही पेस्ट केसांवर लावा. हा हेअर मास्क केसांवर २०-२५ मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर केस धुवून टाका.

नारळपाण्याने करा केसाचे कंडिशनिंग

ज्यांचे केस आणि टाळूची त्वचा ही तेलकट आहे, अशा महिलांनी केसांचे कंडिशनिंग करण्यासाठी नारळपाण्याचा वापर अवश्य करावा. यासाठी सुरूवातीला केस धुवा, ते सुकवा. त्यानंतर ४ चमचे नारळ पाण्यामध्ये १ चमचा अ‍ॅपल सायडर व्हिनेगार मिसळा.

हे दोन्ही घटक चांगल्या प्रकारे मिक्स केल्यानंतर कॉटनच्या मदतीने केसांवर लावा. त्यानंतर केसांची छान मालिश करा आणि केस धुवून टाका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

सायनमध्ये डॉक्टरचा हायव्होल्टेज ड्रामा! नोकरीवरून काढल्याच्या रागात थेट टॉवरवर चढला अन्...; अंगावर काटा आणणारा Video Viral

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

SCROLL FOR NEXT