husband in kitchen
husband in kitchen google
लाइफस्टाइल

Relationship : टाळेबंदीमुळे ६६ टक्के पतींचे प्रथमच स्वयंपाकघरात पाऊल

नमिता धुरी

मुंबई : भारतातील विवाहित पुरूष स्वयंपाकघरात आपल्या पत्नीला सोबत करीत असून ७४% विवाहित पुरूष आठवड्यातून किमान ४-५ वेळा स्वयंपाक करत असल्याचे इमामी मंत्रा मसालाने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे.

कोविडदरम्यान किंवा कोविडनंतर ६६% पती प्रथमच स्वयंपाकघरात आले असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले. सर्वात महत्वाचे म्हणजे ९३% प्रतिसादकांनी कुटुंबातील सदस्यांच्या स्वयंपाकामुळे कुटुंबातील नातेसंबंध सुधारले असल्याचे नमूद केले.

इमामी मंत्रा मसालाने क्राऊनइट मार्केट रिसर्चच्या सहयोगाने किचन ट्रेंड्स जाणून घेण्याच्या उद्देशाने व्यापक संशोधन हाती घेतले होते. हे संशोधन १००० पेक्षा अधिक घरांमध्ये, ३५ वर्षे वयापर्यंतचे स्त्री आणि पुरूष, उच्च आणि मध्यमवर्गीय, आणि भारतातील विविध व्यवसायांमध्ये असलेल्या एकल आणि विवाहित कुटुंबांमध्ये आयोजित करण्यात आले.

९७% घरांमध्ये कोविड पूर्व कालावधीच्या तुलनेत अधिक सकस सामग्रीचा वापर केला जात असल्याचे या संशोधनातून समोर आले असून ९५% घरांमध्ये हेही स्पष्ट करण्यात आले की, कोविडोत्तर कालावधीत त्यांच्या घरात शिजवलेल्या आहाराच्या वैविध्यपूर्णतेत वाढ झाली आहे. यातील जवळपास ९२% प्रतिसादकांनी असेही सांगितले की, मसाल्यांच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.

सर्वेक्षणातून कोविडपूर्व आणि कोविडोत्तर कालावधीतील वापरातील बदलही शोधले गेले. यात ८८% घरांतील व्यक्तींनी ताजी फळे आणि भाज्यांचा वापर वाढला असल्याचे सांगितले. ५३% घरांतील व्यक्तींनी फ्रोजन फूड्सच्या वापरात वाढ झाल्याचे दर्शवले. तर ७४% घरांतील व्यक्तींनी रेडी टू कुक साहित्याच्या वापरात वाढ झाल्याचे दर्शवले.

६५% घरांतील व्यक्तींच्या मते कुकिंग सॉसेस आणि पेस्ट यांच्या वापरात वाढ झाल्याचे दर्शवले आहे. तसेच ७०% घरांतील व्यक्तींनी पॅकेज्ड ब्लेंडेड मसाल्यांच्या वापरात वाढ झाल्याचे दर्शवले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime News : दिल्लीमध्ये 15 टन बनावट मसाला जप्त; लाकडाची पावडर अन् अ‍ॅसिडचा वापर

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT